Lokmat Money >बँकिंग > Loan On Salary : सॅलरीवर लोन मिळत नाहीये? हे कर्ज येईल तुमच्या कामी, दूर होतील समस्या

Loan On Salary : सॅलरीवर लोन मिळत नाहीये? हे कर्ज येईल तुमच्या कामी, दूर होतील समस्या

महागाईच्या युगात स्वतःचे घर घेतल्याने तुमच्या खिशावर मोठा ताण पडू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:49 PM2022-11-14T12:49:04+5:302022-11-14T12:49:38+5:30

महागाईच्या युगात स्वतःचे घर घेतल्याने तुमच्या खिशावर मोठा ताण पडू शकतो.

Not getting loan on salary This loan will come in handy problems will be solved home loan income tax | Loan On Salary : सॅलरीवर लोन मिळत नाहीये? हे कर्ज येईल तुमच्या कामी, दूर होतील समस्या

Loan On Salary : सॅलरीवर लोन मिळत नाहीये? हे कर्ज येईल तुमच्या कामी, दूर होतील समस्या

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते, परंतु महागाईच्या युगात स्वतःचे घर घेतल्याने तुमच्या खिशावर मोठा ताण पडू शकतो. घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक लोक गृहकर्जाची मदत घेतात. अनेक वेळा असे देखील घडते की लोकांना त्यांच्या पगारावर गृहकर्ज मिळत नाही. ही समस्या टाळण्यासाठी आजकाल बँका संयुक्त गृहकर्ज (Joint Home Loan ) देत आहेत. हे कर्ज दोन किंवा अधिक लोकांच्या संयुक्त बँक खात्याशी निगडित असल्याचं यावरून कळून येत आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांसह संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता.

संयुक्त गृह कर्जाचे अनेक फायदे आहेत. या कर्जासाठी अर्ज केल्याने, तुम्हाला गृहकर्ज मिळण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात वाढते. संयुक्त गृहकर्जाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे या कर्जाचा संपूर्ण भार व्यक्तीवर पडत नाही. संयुक्त गृहकर्जासाठी सह-अर्जदाराला जोडणं फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये आई-वडील, पती-पत्नी, भावंडे, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांचा समावेश असू शकतात.

या अटींवर मिळतं कर्ज
या प्रकारच्या कर्जासाठी नोकरी करत असणं आवश्यक आहे. तुम्ही किमान 2 आणि कमाल 6 लोकांसह हे सहजरित्या घेऊ शकता. ज्याची सॅलरी अधिक त्याला त्यात मोठा हिस्सेदार बनवलं पाहिजे हे लक्षात ठेवा. यामुळे इन्कम टॅक्समध्येही फायदा मिळू शकतो. सोबतच तुम्ही स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्कात सूट मिळवू शकता.

गृहकर्जाचे फायदे
जर तुम्ही संयुक्तरित्या अर्ज केला तर यातून करात सूट मिळू शकते. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत दोन्ही जण करात बचत करू शकतात.  यासाठी दोघेही मालक असणं आवश्यक आहे. तेव्हाच दोघांनाही व्याजावर 2 लाख रुपये आणि मूळ रकमेवर 5 लाख रुपयांचा फायदा होईल.

Web Title: Not getting loan on salary This loan will come in handy problems will be solved home loan income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक