बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFC) असुरक्षित मानल्या जाणार्या पर्सनल लोनशी संबंधित नियम रिझर्व्ह बँकेनं अधिक कडक केले. गुरुवारी यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. सुधारित नियमांमध्ये, रिस्क वेट २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. पुनरावलोकनाच्या आधारे, कर्ज प्रकरणातील जोखमीच्या संदर्भात रिस्क वेट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत रिझर्व्ह बँकेनं बँका आणि एनबीएफसीसाठी रिस्क वेट २५ टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे १५० टक्के आणि १२५ टक्के केलं असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.दरम्यान, होमलोन, एच्युकेशन लोन आणि व्हेईकल लोनसारख्या काही कंझ्युमर लोनसाठी सुधारित नियम लागू होणार नाहीत. याशिवाय सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांवर दिलेल्या कर्जावरही हा नियम लागू होणार नाही. या कर्जांवर १०० टक्के रिस्क वेट लागू असेल.काय आहे रिस्क वेटहाय रिस्क वेट म्हणजे असुरक्षित मानल्या जाणार्या पर्सनल लोनच्या बाबतीत, बँकांना अधिक रक्कम बाजूला ठेवावी लागेल. दुसऱ्या शब्दांत हे रिस्क वेट बँकांच्या कर्ज देण्याची क्षमता मर्यादित करतं.यापूर्वीही इशारारिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच कंझ्युमर लोन श्रेणीतील काही कर्जांमध्ये अधिक वाढ झाल्याबद्दल सांगितलं होतं. त्यांनी बँका आणि एनबीएफसींना त्यांच्या सर्विलान्स सिस्टम अधिक मजबूत करावी, वाढत्या जोखमींना सामोरं जावं आणि त्यांच्या हितासाठी योग्य सुरक्षा पावलं उचलावीत असा सल्ला दिला. दास यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या बँका आणि मोठ्या एनबीएफसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना कंझ्युमर लोनमधील अधिक वाढ आणि बँक कर्जावर एनबीएफसीचं वाढते अवलंबत्वाचा देखील उल्लेख केला होता.
आता पर्सनल लोन घेणं होणार कठीण, RBI नं वाढवलं रिस्क वेट; बँकांसाठी नियम केले कठोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:20 AM