Lokmat Money >बँकिंग > ‘एफडी’वर मिळेल आता अधिक व्याज; कोणत्या बँकांनी वाढविला व्याजदर?, जाणून घ्या...!

‘एफडी’वर मिळेल आता अधिक व्याज; कोणत्या बँकांनी वाढविला व्याजदर?, जाणून घ्या...!

इंडसइंड बँकेतील एफडीवर आता कमाल ६.७५ टक्के व्याज मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:12 PM2022-08-18T12:12:55+5:302022-08-18T12:13:01+5:30

इंडसइंड बँकेतील एफडीवर आता कमाल ६.७५ टक्के व्याज मिळेल.

Now you will get more interest on FD; Which banks have increased the interest rate? , lets know | ‘एफडी’वर मिळेल आता अधिक व्याज; कोणत्या बँकांनी वाढविला व्याजदर?, जाणून घ्या...!

‘एफडी’वर मिळेल आता अधिक व्याज; कोणत्या बँकांनी वाढविला व्याजदर?, जाणून घ्या...!

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे आता बँकांनी व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. एसबीआय, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, येस बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांच्यानंतर आता इंडसइंड बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविले आहेत. इंडसइंड बँकेतील एफडीवर आता कमाल ६.७५ टक्के व्याज मिळेल.

कुठे किती व्याजदर?

इंडसइंड बँकेतील ७ ते ३० दिवसांच्या ठेवींवर आता ३.५ टक्के तसेच ३१ ते ६० दिवसांच्या ठेवींवर ४.०० टक्के व्याज मिळेल. याशिवाय ६१ ते ९० दिवसांच्या एफडीवर ४.२५ टक्के, ९१ ते १२० दिवसांच्या ठेवींवर ४.५० टक्के, १२१ ते १८० दिवसांच्या ठेवीवर ४.७५ टक्के, १८१ ते २१० दिवसांच्या ठेवींवर ५.०० टक्के, २११ ते २६९ दिवसांच्या ठेवीवर ५.२५ टक्के आणि २६९ ते ३६४ दिवसांच्या ठेवीवर ५.५० टक्के दराने व्याज मिळेल.  १ वर्ष ते १ वर्ष ६ महिन्यांच्या आतील ठेवीवर ६.२५%, १ वर्ष ६ महिने ते ६१ महिन्यांच्या आतील ठेवींवर ६.७५%  आणि ६१ महिन्यांपेक्षा अधिक मुदतीच्या ठेवींवर ६.२५% व्याज मिळेल.

५ वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत

टाइम डिपॉजिटल स्कीम आणि एफडीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास आयकर कायदा १९६१च्या कलम ८० सी अन्वये आयकरात सूट मिळते. १.५० लाखांपर्यंतची गुंतवणूक यात करमुक्त असते.

Web Title: Now you will get more interest on FD; Which banks have increased the interest rate? , lets know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक