ATM Chargers News: एटीएम युजर्सना १ मे पासून थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एटीएम इंटरचेंज शुल्क वाढीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच जर तुम्ही एटीएममधून पैसे काढले किंवा तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेचा बॅलन्स चेक केला तर तुमच्याकडून जास्त शुल्क आकारलं जाईल. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या सांगण्यावरून आणि आरबीआयच्या मंजुरीनंतर हा बदल होणार आहे.
१ मेपासून एटीएम वापरण्याच्या शुल्कात वाढ होणार आहे. रोख रक्कम काढण्याचे शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत वाढणार आहे. बॅलन्स चेकिंग चार्ज ६ रुपयांवरून ७ रुपयांपर्यंत वाढणार आहे. महिन्यात फ्री लिमिट संपल्यावर हे शुल्क आकारलं जाईल. मेट्रो शहरांमध्ये पाच आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारांना परवानगी आहे.
IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?
का केली वाढ?
आरबीआयच्या मंजुरीनंतर ही वाढ करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावावर आधारित आहे. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर शुल्क वाढीसाठी दबाव टाकत होते. जुन्या फीमुळे वाढता खर्च भागविण अवघड होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
छोट्या बँकांवर अधिक परिणाम
याचा मोठा परिणाम छोट्या बँकांवर होणार आहे. कारण त्यांच्या मर्यादित एटीएम नेटवर्कमुळे ते इतर बँकांच्या एटीएमवर अधिक अवलंबून आहेत. इंटरचेंज फी वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. इंटरचेंज फी ही अशी रक्कम आहे जी ग्राहक दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरतो तेव्हा त्यांची बँक दुसऱ्या बँकेला देते. ओव्हरचार्ज होऊ नये म्हणून एटीएमचा जास्त वापर करणारे लोक आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करू शकतात. ते डिजिटल पेमेंट पद्धतीदेखील अवलंबू शकतात.