Join us

NPCI चं नवं फीचर, खातं लिंक न करताही कुटुंबातील सदस्य करू शकणार UPI ट्रान्झॅक्शन; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 2:42 PM

UPI Transation : जर तुम्ही यूपीआय वापरत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन फीचर आलं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एक नवीन फीचर लाँच केलंय.

UPI Transation : जर तुम्ही यूपीआय (Unified Payment Interface) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन फीचर आलं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) यूपीआय सर्कल नावाचं (UPI Circle) एक नवीन फीचर लाँच केलंय, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना त्यांचं बँक खाते यूपीआयशी लिंक न करता आपल्या बँक खात्यातून यूपीआय व्यवहार करण्यास अधिकृत करू शकता. या अंतर्गत तुम्ही व्यवहार मर्यादा देखील सेट करू शकता, ज्यामुळे तुमच्या बँक खात्याची सिक्युरिटी लेव्हल वाढते.

यूपीआय सर्कल विशेषत: अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांचं स्वतःचं बँक खातं नाही किंवा जे एकच बँक खातं वापरत आहेत. याद्वारे तुम्ही ज्येष्ठ नागरिक, मुले, पती-पत्नी किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना यूपीआयद्वारे पैसे पाठवण्याची परवानगी देऊ शकता. याअंतर्गत एक प्रायमरी युझर जास्तीत जास्त ५ सेकंडरी युझर्सना यूपीआय व्यवहार करण्यास अधिकृत करू शकतो.

UPI Circle चा वापर कसा कराल?

  • BHIM-UPI अॅप किंवा अन्य अॅप ओपन करा आणि त्यात UPI Circle वर क्लिक करा. त्यानंतर Add Family or Friends वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना यात जोडण्यॉासाठी दोन पर्याय मिळतील. QR कोड स्कॅन करा किंवा त्यांचा UPI ID टाका.
  • UPI ID पर्याय निवडल्यास यूपीआय आयडी टाकताना 'Add to my UPI Circle' वर क्लिक करा. पुढे, आपल्याला ज्या व्यक्तीला त्यात जोडायचं आहे त्याचा फोन नंबर टाइप करण्यास सांगितलं जाईल. लक्षात ठेवा की ती व्यक्ती आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणं आवश्यक आहे.
  • यानंतर तुम्हाला २ पर्याय मिळतील. Spend with limits किंवा pprove every payment. पहिल्या पर्यायमध्ये तुम्ही एक लिमिट सेट करू शकता. दुसऱ्या पर्यायात ट्रान्झॅक्शनला मंजुरी द्यावी लागेल. तुम्ही आपल्या गरजेनुसार पर्याय निवडू शकता.
  • जर तुम्ही Spend with limits हा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला मासिक खर्च, मंजुरीची मुदत आणि बँक खात्याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा यूपीआय पिन टाका आणि प्रक्रिया पूर्ण करा. अशा प्रकारे, सेकंडरी युझर आपल्या यूपीआय सर्कलमध्ये जोडला जाईल.
टॅग्स :पैसाबँक