Join us  

Offline UPI Payment: इंटरनेट चालत नाहीये? तरीही करू शकता UPI पेमेंट; पाहा ऑफलाइन पेमेंट प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 5:31 PM

देशात ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. देशातील अनेक लोक पेमेंटसाठी युपीआयचा वापर करतात.

Offline UPI Payment: देशात ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. देशातील अनेक लोक पेमेंटसाठी युपीआयचा वापर करतात. अनेक वेळा असं घडतं की आपण अशा ठिकाणी असतो जिथे मोबाईल इंटरनेट काम करत नाही. इंटरनेट उपलब्ध नसल्यानं अनेकवेळा ते पेमेंट करू शकत नाहीत. परंतु आता इंटरनेटशिवायही तुम्ही सहज युपीआय पेमेंट करू शकता. आपण आज ऑफलाइन युपीआय ​​पेमेंटची पद्धत जाणून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून इंटरनेटशिवाय युपीआय पेमेंट करू शकता.

जरी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसेल तरीही तुम्ही तुमच्या फोनवरून *99# डायल करून UPI ​​पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं खातं युपीआय अॅपवर एकदाच तयार करावं लागेल. यासोबतच तुम्हाला तुमचा फोन नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करावा लागेल. देशातील सर्व मोबाईल कंपन्या त्यांच्या नेटवर्कवर *99# सेवा देतात. ही *99# सेवा हिंदी आणि इंग्रजीसह 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कसं कराल पेमेंट

  • तुम्ही *99# डायल केल्यावर एक मेनू ओपन होईल.
  • येथे तुम्हाला My Profile, Send Money, Receive Money, Pending Requests, Check Balance, UPI Pin आणि Transaction असे पर्याय दिसतील.
  • पेमेंट करण्यासाठी तुम्हाला Send Money हा कोणताही एक पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर, पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला Send Money च्या समोरील नंबर डायल करावा लागेल.
  • UPI द्वारे पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर ज्या पर्यायात तुम्हाला UPI द्वारे रिसिव्हरला पैसे द्यायचे आहेत तो पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम टाका आणि Send वरील बटण दाबा. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 50 पैसे शुल्क भरावे लागेल.
टॅग्स :बँकपैसा