Lokmat Money >बँकिंग > १ ॲाक्टोबरपासून ॲानलाइन खरेदी होणार अधिक सुरक्षित

१ ॲाक्टोबरपासून ॲानलाइन खरेदी होणार अधिक सुरक्षित

१ ॲाक्टोबरपासून टोकनायझेशन प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:47 AM2022-09-20T09:47:11+5:302022-09-20T09:47:57+5:30

१ ॲाक्टोबरपासून टोकनायझेशन प्रणाली

Online shopping will be safer from October 1 | १ ॲाक्टोबरपासून ॲानलाइन खरेदी होणार अधिक सुरक्षित

१ ॲाक्टोबरपासून ॲानलाइन खरेदी होणार अधिक सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ॲानलाइन खरेदी आता अधिक सुरक्षित होणार आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी व डेबिट-क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आरबीआय आता १ ॲाक्टोबरपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे.

कार्ड टोकनायझेशन प्रणालीच्या अंतर्गत डेबिट-क्रेडिट कार्डचे डिटेल्स, जसे की १६ अंकी क्रमांक, नाव, कार्ड वापरण्याचा कालावधी संपण्याची तारीख आणि सीव्हीही देताना एक चार किंवा सहा क्रमाकांचा युनिक नंबर देण्यात येईल. ज्याच्या माध्यमातून सर्व प्रकराची खरेदी आणि पेमेंट करता येणार आहे. हा युनिक टोकन क्रमांक ग्राहकाची कोणतीही माहिती न देता पेमेंट करण्यास मंजुरी देईल. यानंतर व्यापारी तुमच्या कार्डची डिटेल्स आपल्याकडे सेव्ह करू शकणार नाहीत. व्यापाऱ्यांकडे केवळ आपले टोकन जाईल. रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड यांसाठी टोकन देण्यात येणार आहे.

ग्राहकांना काय फायदे? 
डेटा सुरक्षित राहणार. ग्राहकांचे अधिकार वाढणार आहे. ॲानलाइन फसवणुकीचा प्रकार अतिशय कमी होणार आहे. रोजचे व्यवहार किती रकमेपर्यंत करावेत हे ग्राहक स्वत: ठरवणार आहेत.

कसे काम करणार टोकन प्रणाली?

ग्राहक : 
ॲपमधून तयार झालेला युनिक टोकन क्रमांक पेमेंटसाठी एंटर करतील.

मर्चंट प्लॅटफॉर्म 
बंधित बँकेकडे पाठवले जाईल. त्यानंतर बँक टोकनला कार्ड नेटवर्ककडे पाठवेल.

बँक  
टोकनचा डेटा बँकेच्या व्हॉल्टमध्ये सुरक्षित राहील. त्यानंतर टोकन संबंधित बँकेकडे पाठवले जाईल.

नेटवर्क  
टोकनसोबत पॅन, वैयक्तिक खाते क्रमांक, इतर माहिती बँकेला पाठवेल.

जारी करणारी बँक 
मेंटच्या रकमेला तपासून घेत व्यवहाराला मंजुरी देईल.

 

Web Title: Online shopping will be safer from October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.