Join us  

Paytm ला मोठा दिलासा; RBI ने वाढवली डेडलाईन, 'या' तारखेपर्यंत सुरू राहणार पेमेंट सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 6:18 PM

पेटीएम पेमेंट बँकेशी संबंधित ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे.

Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट बँकेशी (Paytm Payments Bank) संबंधित ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने(RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला डिपॉझिट आणि क्रेडिट व्यवहारांसाठी 15 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यापूर्वी आरबीआयने स्पष्ट निर्देश दिले होते की, 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेद्वारे कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार केले जाणार नाहीत. 

31 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएमची बँकिंग सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला होता. यासाठी कंपनीला 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानुसार, 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातील व्यवहार, पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि टॉपअप यासारख्या सेवा बंद होतील. पण, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.

कंपनीला 15 मार्चपर्यंत दिलासाआरबीआयने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत One97 Communications Limited आणि Paytm Payments Services Limited ची नोडल खाती 29 फेब्रुवारी 2024 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत बंद करण्याचे आदेश दिले होते. पण, आता 15 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. आरबीआयने पुढे सांगितले की, लोकांचे हित लक्षात घेऊन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला आणखी काही वेळ दिला जात आहे. 

काय आहे RBI चा आदेशRBI ने कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आढळलेल्या कमतरतेच्या आधारे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सादर केलेल्या माहितीमध्ये अनियमितता आढळून आल्याचे मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे. ही बंदी किती दिवस सुरू असेल, हे बँकेने आपल्या आदेशात स्पष्टपणे सांगितलेले नाही. यावरुन हे स्पष्ट होते की पेटीएम पेमेंट्स बँकेचे युजर एका महिन्यानंतर या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रगुंतवणूक