Lokmat Money >बँकिंग > गृहकर्जासाठी CIBIL Score किती पाहिजे? कमी असेल तर लोन मिळते का? तो कसा तपासायचा?

गृहकर्जासाठी CIBIL Score किती पाहिजे? कमी असेल तर लोन मिळते का? तो कसा तपासायचा?

Personal Finance: स्वप्नातलं घर घेण्यासाठी तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एक गोष्ट तुमचं सर्व काम बिघडवू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:40 AM2024-09-16T11:40:23+5:302024-09-16T11:42:37+5:30

Personal Finance: स्वप्नातलं घर घेण्यासाठी तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एक गोष्ट तुमचं सर्व काम बिघडवू शकते.

personal finance how much cibil score is required for home loan on what basis is cibil score prepared | गृहकर्जासाठी CIBIL Score किती पाहिजे? कमी असेल तर लोन मिळते का? तो कसा तपासायचा?

गृहकर्जासाठी CIBIL Score किती पाहिजे? कमी असेल तर लोन मिळते का? तो कसा तपासायचा?

Cibil Score for Home Loan : आपलं हक्काचं घरं असावं असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असते. हे सत्यात उतरवण्यासाठी गृहकर्ज मोठी मदत करते. मात्र, कागदपत्रे दिली आणि कर्ज मिळालं असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला एका प्रक्रियेतून जावे लागते. या सर्वात महत्त्वाचा असतो तो तुमचा सीबील स्कोअर. जेव्हा तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक सर्वप्रथम तुमचा सीबील स्कोअर तपासते. केवळ होम लोनचा नाही तर अगदी पर्सनल लोनपासून वाहन कर्जापर्यंत प्रत्येक लोनसाठी CIBIL स्कोर महत्त्वाच मानला जातो. अशात गृहकर्जासाठी किती सीबील स्कोअर आवश्यक आहे. तो कमी असेल तर कर्ज मिळते का? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. चला सोप्या शब्दात समजून घेऊ.

सीबील रिपोर्ट आणि सिबिल स्कोर म्हणजे काय?
सीबील स्कोर हा त्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरचा 3 अंकी सारांश असतो. CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोरची नोंद ठेवली जाते. याद्वारे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे आर्थिक उत्पन्न कसे वापरले आहे. यावेळी गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा अन्य कोणत्याही आर्थिक व्यवहाराद्वारे क्रेडिट स्कोर यांची माहिती मिळते. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था लगेच तुम्हाला कर्ज मंजूर करते.

सीबील स्कोर कसा मोजला जातो?
सीबील रिपोर्टमधील क्रेडिट हिस्ट्रीवरुन सीबील स्कोर काढला जातो. यासाठी कर्जदाराचे गेल्या 36 महिन्यांचे क्रेडिट प्रोफाईल तपासले जाते. क्रेडिट प्रोफाइलमध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड आणि इतर आर्थिक व्यवहारांचा समावेश असतो. सीबील स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. साधारणपणे, बहुतेक बँका आणि कर्ज संस्था ७५० आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानतात.

सीबील स्कोर कमी असेल तर गृहकर्ज मिळण्यात अडचण येते?
गृहकर्जाची रक्कम ही कुठल्याही इतर कर्जापेक्षा तुलनेने मोठी असते. त्यामुळे तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी बँका तुमचा सीबील स्कोर तपासतात. त्यामुळे जर तुमचा स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचा कर्ज अर्ज स्वीकारला जाण्याची शक्यता जास्त आहे. जर स्कोअर कमी असेल तर तुमचा कर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो.

सीबील स्कोर कसा सुधारायचा?
वेळेवर पेमेंट करा : तुमच्या पेमेंट रेकॉर्डचा तुमच्या सीबील स्कोअरवर सर्वात मोठा प्रभाव पडतो. तुमचे कर्ज EMI आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर आणि पूर्ण भरा. हे करत राहा आणि कालांतराने तुमचा CIBIL स्कोर आपोआप वाढेल.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा : तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासा, जेणेकरून रिपोर्टमध्ये काही चुकीची माहिती तर नाही ना? किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला आहे का? ह्याची माहिती मिळेल. तुमच्या रिपोर्टमध्ये कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास, ती क्रेडिट ब्युरोला कळवा. अशा प्रकारे, आपण वेळेत आपला स्कोअर सुधारण्यासाठी पावले उचलू शकता.

सीबील स्कोर ऑनलाईन कसा तपासायचा?
‘CIBIL’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. या पेजवर ‘गेट युअर सीबील स्कोर’ हा पर्याय निवडा. तिथे तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, आयडी प्रूफ (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड) सबमिट करा. त्यानंतर पिन कोड, जन्म तारीख, फोन नंबर सबमिट करा. ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू पर्याय निवडा. फोनवर ओटीपी शेअर केला जाईल. तो सबमिट करून कंटिन्यू करा. त्यानंतर डॅशबोर्डवर जाऊन क्रेडिट स्कोर चेक करा. आजकाल गुगल प्ले सारखे यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला फ्रीमध्ये हा पर्याय उपलब्ध करुन देत आहेत.

Web Title: personal finance how much cibil score is required for home loan on what basis is cibil score prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.