Lokmat Money >बँकिंग > Personal Loan: पर्सनल लोन घेतल्यानंतर 'ही' ३ अवश्य टाळा, अन्यथा बसेल दुहेरी फटका

Personal Loan: पर्सनल लोन घेतल्यानंतर 'ही' ३ अवश्य टाळा, अन्यथा बसेल दुहेरी फटका

Personal Loan: पर्सनल लोनचे व्याजदर आधीच खूप जास्त असतात. अशावेळी जर तुम्ही ही रक्कम चुकीच्या ठिकाणी वापरली तर तुम्हाला दुहेरी संकटाला सामोरं जावं लागू शकतं. पर्सनल लोनची रक्कम कुठे वापरणं टाळावं हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:16 IST2025-01-31T11:15:40+5:302025-01-31T11:16:33+5:30

Personal Loan: पर्सनल लोनचे व्याजदर आधीच खूप जास्त असतात. अशावेळी जर तुम्ही ही रक्कम चुकीच्या ठिकाणी वापरली तर तुम्हाला दुहेरी संकटाला सामोरं जावं लागू शकतं. पर्सनल लोनची रक्कम कुठे वापरणं टाळावं हे जाणून घेऊ.

Personal Loan Avoid these 3 things invest use money after taking a personal loan otherwise you will be in trouble | Personal Loan: पर्सनल लोन घेतल्यानंतर 'ही' ३ अवश्य टाळा, अन्यथा बसेल दुहेरी फटका

Personal Loan: पर्सनल लोन घेतल्यानंतर 'ही' ३ अवश्य टाळा, अन्यथा बसेल दुहेरी फटका

Personal Loan: जर तुम्हाला अचानक समस्या उद्भवली आणि तुम्हाला पैशांची नितांत गरज असेल तर तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. पर्सनल लोन तारणमुक्त असतं आणि त्यासाठी फार कागदपत्रांची गरज नसते. अनेक बँका ४० लाखांपर्यंत पर्सनल लोन देतात. पण पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्ही ते कशासाठी घेत आहात याचा नीट विचार करायला हवा. पर्सनल लोनचे व्याजदर आधीच खूप जास्त असतात. अशावेळी जर तुम्ही ही रक्कम चुकीच्या ठिकाणी वापरली तर तुम्हाला दुहेरी संकटाला सामोरं जावं लागू शकतं. पर्सनल लोनची रक्कम कुठे वापरणं टाळावं हे जाणून घेऊ.

शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी - ट्रेडिंग करत असाल तर मोठा नफा कमावण्याच्या नादात पर्सनल लोन घेण्याची चूक कधीही करू नका. अतिआत्मविश्वासानं उचललेलं हे पाऊल तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. शेअर बाजारात आधीच खूप रिस्क असते, त्यामुळे पर्सनल लोन घेऊन तुम्ही आणखी एक मोठी चूक करता. जर तुम्हाला शेअर बाजारात नफा होत नसेल किंवा तुमचे पैसे अडकले असतील आणि पर्सनल लोनचा ईएमआय जास्त व्याजानं सुरू होत असेल तर ती तुमच्यासाठी मोठी समस्या ठरू शकते.

थकबाकी फेडण्यासाठी - तुम्ही कुठून तरी पैसे उधार घेतले असतील तर पर्सनल लोन घेऊन ते फेडण्याची चूक करू नका. यामुळे तुम्ही एका ठिकाणाहून नक्कीच मोकळे व्हाल, पण तुम्ही पर्सनल लोनच्या चक्रात अडकणार आहात आणि अनेक वर्षे ईएमआय भरत राहाल. जर तुम्ही हे कर्ज फेडू शकत नसाल, तर तुम्ही स्वत:च्या अडचणी वाढवून घ्याल. अशा वेळी तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

छंद पूर्ण करण्यासाठी - आपले वैयक्तिक छंद काहीही असोत, ते सर्व अनावश्यक खर्चांचा भाग मानले जातात. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमच्या छंदासाठी हिऱ्याचा हार किंवा अंगठी घ्यायची असेल किंवा महागडा मोबाइल खरेदी करायचा असेल तर हे छंद पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोनचा आधार घेऊ नका. घराचं बजेट लक्षात घेऊन आपले छंद पूर्ण करा. स्टेटसच्या चक्रात हे छंद पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेतल्यास तुम्ही स्वत:साठी अडचणी निर्माण कराल.

पर्सनल लोन कधी घ्यावं?

जर तुम्हाला पैशांची नितांत गरज असेल किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल आणि कोठूनही पैशांची व्यवस्था करण्यास असमर्थ असाल तर तुम्ही पर्सनल लोनचा पर्याय निवडू शकता. पण अशा परिस्थितीतही कर्ज घेतल्यानंतर त्याचा ईएमआय तुम्ही वेळेवर फेडू शकाल का, याची सगळी गणितं एकदा करायला हवीत. एवढं सगळं झाल्यानंतरच पर्सनल लोनसाठी अर्ज करा. जर तुम्ही त्याची परतफेड करण्यास असमर्थ असाल तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होईल आणि भविष्यात तुमच्यासाठी कर्जाचे मार्ग बंद होऊ शकतात.

Web Title: Personal Loan Avoid these 3 things invest use money after taking a personal loan otherwise you will be in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.