Lokmat Money >बँकिंग > पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

आपल्याला अचानक जर पैशांची गरज भासली तर कर्जासाठी हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:35 AM2023-07-10T09:35:47+5:302023-07-10T09:36:50+5:30

आपल्याला अचानक जर पैशांची गरज भासली तर कर्जासाठी हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

personal loan gold loans interest is high Banks giving loans on FD interest rates are also low know details overdraft money | पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

कोणतंही सोंग घेता येतं पण पैशांचं सोंग घेता येत नाही असं म्हणतात. या अनिश्चिततेच्या काळात कोणालाही कधीही पैशाची गरज भासू शकते. आजकाल लोक त्यांच्याकडे जास्त रोख रक्कम ठेवत नाहीत. इतकंच नाही तर जी रक्कम वाचते ती गुंतवण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा परिस्थितीत अचानक मोठ्या रकमेची गरज भासली तर. लोक एकतर त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेतात किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. ज्या लोकांकडे सोनं आहे, ते लोक गोल्ड लोनचा पर्याय स्वीकारतात.

पर्सनल लोनचे व्याजदर हे अधिक असतात. तुमचा CIBIL स्कोअर चांगला नसल्यास तुम्हाला मोठा व्याजदर द्यावा लागू शकतो. गोल्ड लोनवरील व्याजदर थोडे कमी आहेत. परंतु असंही लोन आहे ज्यावर तुम्हाला व्याजदर हे पर्सनल लोन आणि गोल्ड लोन पेक्षा कमी लागतं. 

एफडीवर घेऊ शकता लोन
आपण इथे एफडीवरील लोन बाबत बोलत आहोत. जर तुम्ही एफडी केली असेल, तर तुम्ही एफडीवर कर्ज देखील घेऊ शकता. हे सुरक्षित कर्ज आहे, त्यामुळे बँका हे कर्ज सहज देतात. या कर्जाची परतफेड करण्यासाठीही निश्चित कालावधीदेखील नसतो.

कसं मिळतं कर्ज?
बँका सहसा एफडीवर ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात कर्ज देतात. यामध्ये बँका एफडी तारण म्हणून ठेवून क्रेडिट मर्यादा जारी करतात. हे क्रेडिट लिमिट तुमच्या एफडीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या ७० ते ९५ टक्क्यांपर्यंत असू शकतं. काही बँका यापेक्षाही अधिक कर्ज देतात. ओव्हरड्राफ्टची रक्कम बँकेने मंजूर केल्यानंतर, ग्राहक ही रक्कम ओव्हरड्राफ्ट खात्यातून काढू शकतो. या कर्जाची परतफेड करण्यासाठी निश्चित कालावधी नाही. अशा परिस्थितीत ग्राहक त्याच्या परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन हे कर्ज फेडू शकतो. ओव्हरड्राफ्ट मंजूर रकमेपेक्षा कमी असल्यास, तुम्ही काढलेल्या रकमेवरच व्याज आकारलं जातं.

किती आहेत व्याजदर?
एफडी कर्जावरील व्याजदर प्रत्येक बँकेनुसार बदलू शकतो. परंतु हा व्याजदर एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ०.५ टक्के ते २ टक्क्यांपर्यंत जास्त असू शकतो. म्हणजेच तुमच्या एफडीवर ६ टक्के व्याज असेल तर एफडीवरील कर्जावर ६.५ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर असू शकतात.

Web Title: personal loan gold loans interest is high Banks giving loans on FD interest rates are also low know details overdraft money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.