Lokmat Money >बँकिंग > Personal Loan : 'या' गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, फटाफट मिळेल पर्सनल लोन; पाहा कसा करू शकता अप्लाय

Personal Loan : 'या' गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, फटाफट मिळेल पर्सनल लोन; पाहा कसा करू शकता अप्लाय

आजच्या काळात पैशांची तातडीची गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:50 PM2022-08-30T19:50:32+5:302022-08-30T19:52:11+5:30

आजच्या काळात पैशांची तातडीची गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय बनला आहे.

personal loan keep these things in mind rules conditions eligibility criteria know how to apply consumer news | Personal Loan : 'या' गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, फटाफट मिळेल पर्सनल लोन; पाहा कसा करू शकता अप्लाय

Personal Loan : 'या' गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, फटाफट मिळेल पर्सनल लोन; पाहा कसा करू शकता अप्लाय

आजच्या काळात पैशांची तातडीची गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय बनला आहे. अनेकदा लोकांना पर्सनल लोनच्या अटी आणि इतर बाबींबद्दल फारच कमी माहिती असते. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संबंधित विशेष पैलूंबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही बँकेकडे पर्सनल लोनसाठी अर्ज करता तेव्हा बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी काही गोष्टींच्या आधारे तुमच्या पात्रतेचे मूल्यांकन करते. क्रेडिट स्कोर हा यापैकी एक आहे.

पर्सनल लोनमध्ये तुम्हाला कोणत्याही मालमत्तेचे तारण किंवा हमी देण्याची गरज नाही. काही गोष्टी आणि कर्ज फेडण्याची तुमची क्षमता पाहून बँक तुम्हाला पैसे देते. यासाठी काही कागदपत्रे आणि पात्रता आवश्यक आहेत.

कोणत्या अटींवर मिळतं लोन
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जदाराला क्रेडिट मिळते. अर्ज मंजूर करायचा की नाही हे ठरवण्यात याची लेंडरला मदत करते. चांगला क्रेडिट स्कोअर कर्जदाराला कर्ज मिळण्याची शक्यता वाढवतो. तर खराब क्रेडिट स्कोअर ही शक्यता कमी करते. तुम्ही एका संस्थेत किमान एक वर्ष काम करत आहात अशात आपण सहजपणे पर्सनल लोन मिळवू शकता. त्याच वेळी, व्यवसायात सलग दोन वर्षे काम केल्यानंतर, तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते.

जर तुमचे कोणत्याही बँकेशी चांगले आणि जुने संबंध असतील, जर तुम्ही आधीच वेळेवर कर्ज भरले असेल, तर बँक तुम्हाला सोप्या अटींवर आणि इतरांपेक्षा कमी व्याजदरावर कर्ज देऊ शकते. बँकेच्या विद्यमान ग्राहकांना प्री अप्रुव्ह्ड लोन ऑफर मिळू शकतात.

कोणत्या कागदपत्रांची गरज
जेव्हा तुमचे पर्सनल लोन मंजूर होते, त्यानंतर नोकरीचे तपशील, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट यासारखी कागदपत्रे बँकेत आवश्यक आहेत. हे ऑनलाइन सबमिट केल्यानंतर किंवा अपलोड केल्यानंतर, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. तुमची कागदपत्रे जुळली नाहीत तर काम अडकू शकते किंवा तुमचा अर्जही नाकारला जाऊ शकतो.

Web Title: personal loan keep these things in mind rules conditions eligibility criteria know how to apply consumer news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.