नवी दिल्ली : नॅशनल पेन्शन सिस्टमसाठी (NPS) खाती उघडण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता NPS साठी खाते उघडण्याची सुविधा देणाऱ्या पीओपीला (PoP) सप्टेंबरपासून कमिशन मिळेल. 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या 'या' योजनेत पीओपींना किमान 15 रुपये आणि कमाल 10 हजार रुपये मिळतील. हे कमिशन पीओपीला उपलब्ध होईल, जेव्हा सदस्य 'ऑल सिटिजन मॉडेल' अंतर्गत त्यांच्या खात्यातून पैसे थेट संबंधित संस्थेला पाठवण्याचा पर्याय निवडतात.
एनपीएस खाती उघडण्यासाठी पॉइंट ऑफ प्रेझेन्स (PoP) सुविधा देणार्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यांना शुल्कापोटी नुकसान होत आहे. पीओपीमध्ये बँका, एनबीएफसी आणि इतर संस्थांचा समावेश होतो. ते NPS अंतर्गत नोंदणीसह सदस्यांना संबंधित सेवा प्रदान करतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) म्हटले आहे की, या निर्णयामुळे पीओपींना चालना मिळेल. कारण ते NPS खाते उघडण्याचा प्रयत्न करतात.
PFRDA ने जारी केलेल्या माहितीनुसार, NPS च्या विस्ताराच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून निश्चित कालावधीत कमिशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीएसमध्ये योगदानासाठी बँक खात्यातून थेट पैसे संबंधित एजन्सीकडे हस्तांतरित करणे हे ई-एनपीएससारखे आहे. यावरील कमिशन संबंधित पीओपीला देण्यात येणार आहे. थेट ट्रान्सफरवर निश्चित कालावधीसाठी पीओपीला दिले जाणारे कमिशन योगदान रकमेच्या 0.20 टक्के असेल, असेही PFRDA ने म्हटले आहे.
किमान कमिशन रक्कम 15 रुपये
अशा प्रकारे कमिशन किमान 15 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असेल. हे कमिशन ग्राहकाकडून त्यांच्या गुंतवलेल्या युनिट्सची संख्या वजा केल्यानंतर ठराविक अंतराने आकारले जाईल. थेट संबंधित एजन्सीकडे निधी ट्रान्सफर करण्याची सुविधा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन म्हणून सुरू करण्यात आली आहे. जर ट्रस्टी बँकेला सकाळी 9.30 च्या आधी योगदानाची रक्कम मिळाली, तर ती त्याच दिवशी नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) ऑफर करून ग्राहकांच्या गुंतवणुकीचा परतावा इष्टतम करते.