Lokmat Money >बँकिंग > PhonePe-ZestMoney Deal: फोन पे देखील आता शॉपिंग करणार; तोट्यातली झेस्ट मनी खरेदी करणार

PhonePe-ZestMoney Deal: फोन पे देखील आता शॉपिंग करणार; तोट्यातली झेस्ट मनी खरेदी करणार

देशात सध्या ऑनलाईन श़ॉपिंगमध्ये आता खरेदी करा, नंतर पैसे द्या ही संस्कृती रुजली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 04:11 PM2022-11-25T16:11:04+5:302022-11-25T16:12:09+5:30

देशात सध्या ऑनलाईन श़ॉपिंगमध्ये आता खरेदी करा, नंतर पैसे द्या ही संस्कृती रुजली आहे.

PhonePe-ZestMoney Deal: PhonePe may buy BNPL startup ZestMoney | PhonePe-ZestMoney Deal: फोन पे देखील आता शॉपिंग करणार; तोट्यातली झेस्ट मनी खरेदी करणार

PhonePe-ZestMoney Deal: फोन पे देखील आता शॉपिंग करणार; तोट्यातली झेस्ट मनी खरेदी करणार

पैशांचे व्यवहार, बिल भरणा, इन्शुरन्स आदींसह आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपनी फोन पे एक महत्वाची कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे. या व्यवहाराबाबत माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी याची पुष्टी केली आहे. 

देशात सध्या ऑनलाईन श़ॉपिंगमध्ये आता खरेदी करा, नंतर पैसे द्या ही संस्कृती रुजली आहे. फोन पे कंपनी फिनटेक स्टार्टअप कंपनी झेस्टमनीचे अधिग्रहण करणार आहे. यासाठी चर्चा सुरु आहेत. झेस्टच्या खरेदीसाठी जवळ जवळ 200 डॉलर ते 300 दशलक्ष डॉलरच्या दरम्यानचे व्हॅल्यूशन मिळू शकते. त्याचा मसुदा तयार केला जात असून येत्या दोन ते तीन आठवड्यांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते.

ZestMoney ची स्थापना ही २०१५ मध्ये झाली होती. PayU, Zip, Ribbit Capital, Quona Capital, Xiaomi, Omidyar Network, Goldman Sachs या बड्या गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत सुमारे $140 दशलक्ष जमा केले आहेत. ZestMoney चा महसूल गेल्या वर्षीपेक्षा (89 कोटींवरून) वाढून 145 कोटी रुपये होणार आहे. कंपनीचा तोटा देखील ₹125.8 कोटी रुपयांवरून वाढून ₹398.8 कोटी झाला आहे.

Web Title: PhonePe-ZestMoney Deal: PhonePe may buy BNPL startup ZestMoney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.