आपली स्वत:ची कार हवी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बजेटच्या कमतरतेमुळे अनेकजण कार लोनचा पर्याय निवडतात. कंपन्यांनी कार लोन घेण्याची प्रक्रियाही खूप सोपी केली आहे. तुमचं उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता पाहून बँका कार लोन सहज प्रोसेस करतात. पण कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
इंटरेस्ट रेट
कार लोन घेण्यापूर्वी बाजारातील वेगवेगळ्या लेंडर्सद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे. विविध बँका आणि वित्तीय संस्थांची तुलना करून सर्वात कमी व्याजदरासह कार लोन शोधा. व्याजदर जितका कमी असेल तितके कमी व्याज तुम्हाला द्यावं लागेल.
क्रेडिट स्कोअर
तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देते. तुमची यापूर्वीची पेमेंट्स तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतात. तुम्ही यामध्ये उशीर केल्यास त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर एकदा तपासा.
लोनचा कालावधी
तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला डेडलाइन दिली जाते. तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड फक्त त्या मुदतीतच करावी लागते. बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी किती मुदत देते हे तुम्ही एकदा तपासलं पाहिजं. अनेकदा असं घडतं की कर्जाचा कालावधी जास्त असतो आणि तुम्हाला कमी हप्ता भरावा लागतो. अशा परिस्थितीत, हे देखील शक्य आहे की आपण कर्जापेक्षा अधिक पैसे फेडता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कर्जाचा कालावधी निवडावा.
अन्य शुल्क
कर्जाची रक्कम आणि व्याजासह बँकेकडून विविध प्रकारचं शुल्कही आकारलं जातं. यामध्ये अर्ज शुल्क, ओरिजिनेशन फी आणि प्रीपेमेंट पेनेल्टी यांसारख्या अनेक शुल्कांचा समावेश आहे. आपण या शुल्कांबद्दल काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. कधीकधी हे शुल्क खूप जास्त असतं. प्रथम, बँकेकडून सर्व माहिती गोळा करा आणि त्यानंतरच कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.