Join us  

PM Jan dhan Account: बँक खात्यात शून्य बॅलन्स आहे? तरी काढू शकता १० हजार, फटाफट सुरू करा हे अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 6:32 PM

पाहा यात कोणकोणत्या सुविधा मिळतात.

तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana), शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 41 कोटींच्या पुढे गेली आहे. या अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये खातेदारांना अनेक सुविधा मिळतात.

या खात्याअंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेद्वारे 10,000 रुपये काढू शकता. याशिवाय, रुपे डेबिट कार्डची (Rupay Debit Card) सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता.

२०१४ मध्ये सुरू केली योजनाविशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना त्याचवर्षी 28 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. सरकारने 2018 मध्ये अधिक सुविधा आणि फायद्यांसह योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला होता.

झिरो अकाऊंट कमीसरकारनं  दिलेल्या माहितीनुसार 2015 पासून सातत्याने झिरो बॅलन्स असलेल्या खात्यांच्या संख्येत घट झाली आहे. मार्च 2015 मध्ये, 58 टक्के खाती अशी होती की त्यात कोणतीही शिल्लक नव्हती, जी संख्या आता 7 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच आता लोक त्यात पैसेही जमा करू लागले आहेत.

कोणत्या सुविधा मिळतात?

  • जनधन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे खातेही उघडता येते.
  • यात खातं सुरू केल्यास रुपे एटीएम कार्ड, 2 लाखांचा अपघात विमा, 30 हजारांचे लाईफ कव्हर आणि जमा रकमेवर व्याज मिळते.
  • ग्राहकांना यावर 10 हजारांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही मिळते.
  • कोणत्याही बँकेत हे खाते उघडले जाऊ शकते.
  • यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही.
टॅग्स :पैसाबँक