Lokmat Money >बँकिंग > PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:40 AM2022-11-26T09:40:09+5:302022-11-26T09:42:18+5:30

PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

pnb customers should update kyc by december 12, 2022 may lead to restriction of operations | PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या पीएनबी ग्राहकांनी अद्याप आपले केवायसी (Know Your Customer) अपडेट केलेले नाही, त्यांना पुढील महिन्यापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  12 डिसेंबरनंतर ज्या ग्राहकांचे केवायसी अपडेट करणे प्रलंबित राहील, त्यांना आपल्या खात्यातून व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. 

बँकेने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ग्राहकांनी आपसे केवायसी 12 डिसेंबर 2022 पर्यंत अपडेट करावे. पीएनबीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या ग्राहकांचे केवायसी अपडेट प्रलंबित आहे, त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आणि त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे दोन सूचना पाठवण्यात आल्या आहेत. बँकेने 20 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या सोशल मीडिया खात्यावर या संदर्भात एक अधिसूचना देखील शेअर केली होती.

पीएनबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते- 'आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी केवायसी अपडेट करणे अनिवार्य आहे. जर तुमचे खाते 30.09.2022 पर्यंत केवायसी अपडेटसाठी वेळ होती, तर तुम्हाला त्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला विनंती आहे की, 12.12.2022 पूर्वी तुमचे केवायसी अपडेट करण्यासाठी बेस ब्राँचशी संपर्क करा. अपडेशन केले नाही तर तुमच्या खात्याच्या ऑपरेशनवर बंदी घातली जाऊ शकते.

रिझर्व्ह बँकेचा सल्ला
दरम्यान, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतरानंतरही ते अपडेट करण्यास सांगत आहेत.

कसे अपडेट करता येईल केवायसी?
केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्ता, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. तुम्ही ई-मेल पाठवून देखील हे काम पूर्ण करू शकता. तसेच, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. कोणत्याही ग्राहकाला केवायसी अपडेटसाठी फोन करण्यात आला नाही, हे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला केवायसी संबंधित समस्या असल्यास ते थेट बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Web Title: pnb customers should update kyc by december 12, 2022 may lead to restriction of operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.