Poonawalla Fincorp Gold Loan: पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडनं गोल्ड लोन व्यवसायात प्रवेश केला आहे. सायरस पूनावाला समूहाच्या कंपनीनं गोल्ड लोन बिझनेस सुरू करून सुरक्षित कर्ज देणाऱ्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केलाय. पूनावाला फिनकॉर्पचा शेअर मंगळवारी बीएसईवर ३७५ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५१३.९५ रुपये आहे.
पूनावाला फिनकॉर्पने एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड लोन सामान्य जनता आणि व्यवसायासाठी सुरक्षित, जलद आणि पारदर्शक फायनान्सिंग सोल्यूशन प्रदान करतं. व्यवसायाचा विस्तार आणि वैयक्तिक खर्च अशा विविध आर्थिक गरजा यातून भागवल्या जातात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कमीत कमी कागदपत्रं आणि परतफेडीच्या अनेक पर्यायांसह ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात गोल्ड लोन मंजूर केलं जाईल, जेणेकरून ग्राहक आपले सोनं न विकता त्याच्या मूल्याचा फायदा घेऊ शकतील.
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेनं कर्जाचे व्याजदर केले कमी; EMI चा भार हलका होणार, पाहा नवे दर
४०० ब्रांच उघडण्याची तयारी
सोन्याच्या कर्जाच्या व्यवसायासह टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पीएफएल) पुढील चार तिमाहीत टप्प्याटप्प्याने ४०० नवीन शाखा उघडण्याची योजना आखत आहे. कंपनी तिच्या शाखा आणि स्थानिक पोहोचद्वारे कर्जाची सुविधा उपलब्ध करून देते.
शेअरमध्ये मोठी तेजी
गेल्या पाच वर्षांत पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये २०५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १७ एप्रिल २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १७.२० रुपयांवर होते. १५ एप्रिल २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ३७५ रुपयांवर पोहोचले. गेल्या चार वर्षांत कंपनीचे शेअर्स २३७ टक्क्यांहून अधिक वधारलेत. तर गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)