आर्थिक तज्ज्ञ सुचवतात की तुम्ही तुमच्या गृहकर्जाचे प्रीपेमेंट करून लाखो रुपयांची बचत करू शकता. व्याजात 1 टक्के वाढ झाली तरी तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकतं. घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतेच. बँकाही गृहकर्ज सहज उपलब्ध करून देतात. गृहकर्जाचा ईएमआय काही वर्षांच्या कालावधीत भरावा लागतो. अशा स्थितीत व्याजदरात थोडाफार बदल झाला तरी कर्जदारांना लाखो रुपये जादा भरावे लागतात. कर्जदारांनी लवकरात लवकर गृहकर्जाची परतफेड करावी, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. याद्वारे तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता. विशेषत: बँका व्याजदर वाढवत असताना, गृहकर्ज प्रीपेमेंट हा एक स्मार्ट मार्ग आहे. असे झाल्यास, तुम्हाला 30 लाख रुपयांच्या कर्जावर 4.5 लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.
क्रेडेन्स वेल्थचे संस्थापक कीर्तन ए शाह म्हणाले की, एप्रिल 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग झाली. एप्रिल 2020 मध्ये, गृहकर्जाचे सरासरी व्याजदर 6.70 टक्के होते, जे आता 8.65 टक्के झाले आहे. जेव्हा बँक तुमच्या कर्जावरील व्याज वाढवते तेव्हा त्याचा दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो. गृहकर्जाचा कालावधी निश्चित ठेवल्यास EMI वाढेल. ईएमआय स्थिर ठेवल्यास गृहकर्जाचा कालावधी वाढेल. गृहकर्जावरील व्याजदरात 1 टक्का वाढ झाल्याचा काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
30 लाखांच्या लोनवर किती व्याज?
समजा 30 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले आहे. एप्रिल 2022 पर्यंत, व्याज दर 6.7 टक्के होता. त्या आधारावर 20 वर्षांत एकूण 54.53 लाख रुपये परत करावे लागतील. यामध्ये व्याजाचा हिस्सा 24.53 लाख रुपये आहे. प्रत्येक महिन्याचा ईएमआय 22722 रुपये होतो. या कर्जाची मुदत 15 वर्षांपर्यंत केल्यास एकूण 53.65 लाख रुपये परत करावे लागतील. व्याजाचा भाग 23.65 लाख रुपये असेल. प्रत्येक महिन्याचा ईएमआय 29807 रुपये असेल. म्हणजे तुम्हाला सुमारे एक लाख रुपये कमी व्याज द्यावे लागतील.
1 टक्के वाढीनं किती फरक?
व्याजदरात वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचा दर 7.7 टक्के झाला असे मानू. आता प्रत्येक महिन्याचा ईएमआय 24536 रुपयांपर्यंत वाढेल. यानंतर एकूण 58.88 लाख रुपयांची परतफेड करावी लागेल. व्याजाचा भाग वाढून तो 28.88 लाख रुपये होील. म्हणजेच 30 लाखांच्या कर्जावरील व्याजदरात 1 टक्के वाढ झाल्यास सुमारे 4.5 लाख रुपये अतिरिक्त व्याजाच्या रूपात द्यावे लागतील.
सध्या व्याजदर 8.65 टक्क्यांपर्यंत
आता व्याजदर 8.65 टक्के वाढला आहे. सध्याच्या व्याजदराच्या आधारावर, 20 वर्षांमध्ये 30 लाख रुपयांच्या गृहकर्जाची एकूण परतफेड 63.16 लाख रुपये असेल. दरमहा ईएमआय 26320 रुपये असेल आणि एकूण व्याजाची रक्कम 33.16 लाख रुपये असेल. एप्रिल 2022 च्या तुलनेत, 30 लाख रुपयांच्या कर्जावर सुमारे 8.63 लाख रुपये अधिक व्याज म्हणून भरावे लागतील.