Join us  

HDFC Bank चा ग्राहकांना झटका, पुन्हा वाढणार तुमच्या लोनचा ईएमआय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 7:47 PM

बँकेच्या या निर्णयामुळे जुन्या आणि नव्यानं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा ईएमआय आता वाढणार आहे.

खाजगी क्षेत्रातील मोठ्या एचडीएफसी बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 10 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. MCLR दर वाढल्याने नवीन आणि जुन्या गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर अनेक कर्जांचे EMI महाग होणार आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या सर्व टेन्योरसाठी हे लेंडिंग रेट्स वाढवले ​​आहेत. वाढलेले नवीन दर बुधवार 7 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेत.

एडीएफसी बँकेनं आपल्या 1 वर्षांचा एमएलसीआर रेट वाढवून 8.2 टक्के केला आहे. तर ओव्हरनाइट एमएलसीआर रेट वाढवून 7.9 टक्के केलाय. 1 वर्षांच्या एमएलसीआर रेटमध्ये वाढ रिटेल लोनच्या कारणामुळे महत्त्वाचे ठरते. बँकेचे लाँग टर्म लोन्स जसे की होम लोन या रेटला लिंक्ड असतात. एचडीएफसी बँकेनं 1 महिना, 3 महिने, आणि 6 महिन्यांच्या टेन्योरसाठी एमएलसीआर रेटमध्ये अनुक्रमे 7.90 टक्के, 7.95 टक्के आणि 8.05 टक्के वाढ केली आहे.

कोणतीही बँक आपले व्याजदरर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटवर ठरवतात. एमएलसीआर रिझर्व्ह बँकेद्वारे 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता. हा रेट कमी झाला किंवा वाढला तर त्यावर ग्राहकांचा ईएमआय अवलंबून असतो. बँका आपापल्या हिशोबाना एमएलसीआर ठरवत असतात. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात बदल केल्यानंतर बँका आपल्या एमएलसीआर दरात बदल करतात. जर एमएलसीआर अधिक असेल तर ग्राहकांना अधिक व्याज द्यावं लागतं. ते कमी झाल्यानंतर कमी व्याजदरानं ईएमआय द्यावे लागतात.

टॅग्स :एचडीएफसीभारतीय रिझर्व्ह बँक