Lokmat Money >बँकिंग > करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात

Punjab National Bank : हे कर्जाचे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या योजनेंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता? हे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:42 PM2022-09-19T17:42:31+5:302022-09-19T17:45:07+5:30

Punjab National Bank : हे कर्जाचे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या योजनेंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता? हे जाणून घ्या...

punjab national bank offer 50k rupees for farmers pnb kisan tatkal loan yojana  | करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे कर्जाचे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या योजनेंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता? हे जाणून घ्या...

पंजाब नॅशनल बँक पीएनबी किसान तत्काळ कर्ज योजनेची सुविधा ग्राहकांना देत आहे, ज्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. बँकेने ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने किसान तत्काळ कर्ज योजना आणली आहे.

- 50,000 च्या कमाल कर्जासह मर्यादेच्या 25%
- कर्ज सुरक्षिततेची हमी न देता
- किमान कागदपत्रे आवश्यक 

कोणत्याही कामासाठी घेऊ शकता कर्ज 
पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, या योजनेअंतर्गत तुम्हाला शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी पैशांची गरज आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. किसान तत्काळ कर्ज योजना प्रत्येक मदतीसाठी तयार आहे.

योजनेचा कोणाला होईल लाभ?
पंजाब नॅशनल बँकेच्या तत्काळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही कृषी क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा शेतजमिनीचे भाडेकरू असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कर्जदाराला शेतकरी असणे बंधनकारक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच, यासाठी त्यांच्याकडे मागील दोन वर्षांचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

कोणतेही सेवा शुल्क नाही
बँकेच्या अधिसूचनेनुसार, शेतकर्‍यांना किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्या विद्यमान कर्ज मर्यादेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाईल, कमाल मर्यादा 50,000 रुपये आहे. हे कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांना कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी दिला जाईल. या कर्जाचे हप्तेही सोपे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना परतफेड करताना कोणतीही अडचण येऊ नये.

अशा प्रकारे करू शकता अर्ज?
कर्ज घेण्यासाठी शेतकरी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. याठिकाणी शेतकरी फॉर्म मागवून कर्जासाठी अर्ज करू शकता. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

Web Title: punjab national bank offer 50k rupees for farmers pnb kisan tatkal loan yojana 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.