Lokmat Money >बँकिंग > PNB Alert: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे का? तर पहिलं 'हे' काम करा; अन्यथा तुमचं खाते बंद होईल

PNB Alert: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे का? तर पहिलं 'हे' काम करा; अन्यथा तुमचं खाते बंद होईल

Punjab National Bank Alert : तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अन्यथा तुमचे खाते निष्क्रीय होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:47 PM2024-09-23T15:47:10+5:302024-09-23T15:48:32+5:30

Punjab National Bank Alert : तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अन्यथा तुमचे खाते निष्क्रीय होऊ शकते.

punjab national bank pnb alert to customers these type of account will be close if do not do this work | PNB Alert: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे का? तर पहिलं 'हे' काम करा; अन्यथा तुमचं खाते बंद होईल

PNB Alert: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे का? तर पहिलं 'हे' काम करा; अन्यथा तुमचं खाते बंद होईल

Punjab National Bank Alert : जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या काही खातेधारकांना पुन्हा अलर्ट जारी केला आहे. ज्यांच्या खात्यात २ वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही किंवा या खात्यांमध्ये शिल्लक शून्य आहे. अशा ग्राहकांना हा अलर्ट पाठवण्यात आला आहे. बँकेने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर एका पोस्टद्वारे अशी खाती बंद केली जातील, असं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या PNB खात्यात ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा.

सोशल मीडियाद्वारे अलर्ट
पीएनबीने आपल्या ट्विटरवर एक अलर्ट जारी केला आहे, 'जर २ वर्षांपासून तुमच्या खात्यात कोणताही व्यवहार झाला नसेल तर अशी खाती बंद करण्यात येणार आहे. लवकरात लवकर तुमच्या खात्यात व्यवहार चालू आहेत, याची खात्री करा, जेणेकरून तुमचं खांत बंद होणार नाही. याआधीही बँकेकडून ग्राहकांना याबाबत अनेकदा सतर्क करण्यात आले आहे. यावेळी कोणतीही डेडलाईन देण्यात आलेली नाही.

ग्राहकांना अनेकवेळा इशारा
अनेक खात्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्राहकांकडून कोणतेही व्यवहार झाले नाहीत आणि त्यामध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचे निरीक्षण पंजाब नॅशनल बँकेने नोंदवले आहे. अशा परिस्थितीत या खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात, बँकेने यापूर्वीही ग्राहकांना अनेकदा अलर्ट पाठवले आहेत.

ही खाती बंद केली जाणार नाहीत
पंजाब नॅशनल बँकेने याआधीच स्पष्ट केले होते की अशी सर्व खाती कोणतीही सूचना न देता बंद केली जातील. पण, डीमॅट खात्यांशी जोडलेली अशी खाती बंद केली जाणार नाहीत. तसेच २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसह विद्यार्थ्यांची खाती, अल्पवयीन मुलांची खाती, SSY/PMJJBY/PMSBY/APY सारख्या योजनांसाठी उघडलेली खाती देखील सस्पेंड केली जाणार नाहीत.

खाते सक्रिय करण्यासाठी काय करायचं? 
खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास किंवा कोणतीही मदत घ्यायची असल्यास ते थेट त्यांच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकतात. पीएनबीच्या मते, खातेधारकाने त्यांच्या खात्याच्या केवायसीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाखेत सबमिट केल्याशिवाय अशी खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकत नाहीत. म्हणजेच, जर तुम्हाला तुमचे खाते सक्रिय ठेवायचे असेल तर बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

PNB शेअरची आज काय स्थिती आहे? 
पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. तिचे बाजार भांडवल १.२२ लाख कोटी रुपये आहे. या बँकेच्या (PNB शेअर्स) समभागांबद्दल बोलायचे तर ते सतत वेगाने वाढत आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, ते १०८.५९ रुपयांच्या पातळीवर उघडला आणि ३ टक्क्यांच्या वाढीसह १११.४२ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
 

Web Title: punjab national bank pnb alert to customers these type of account will be close if do not do this work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.