पीएनबीची सुमारे सव्वातीन लाख खाती निष्क्रिय होऊ शकतात. या खातेदारांनी अद्याप केवायसी केलेली नसल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, अशा खातेदारांना १२ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलीये. यानंतर त्यांना आपल्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. अशी परिस्थिती टाळायची असेल तर केवायसी लवकर करावी लागेल. केवायसी कशी करावी लागेल हे आपण जाणून घेऊ.
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत जर तुमचं खातं असेल तर सावध व्हा. या बँकेच्या सुमारे साडेतीन लाख खातेदारांनी अद्याप आपलं केवायसी अपडेट केलेलं नाही. अशा खातेदारांना १२ ऑगस्ट २०२४ पर्यंतमुदत देण्यात आली आहे. त्यांनी या तारखेपर्यंत तसे न केल्यास त्यांच्या खात्यातील कामकाज बंद होऊ शकतं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व बँका आपल्या खातेदारांकडून नो योर कस्टमर्स म्हणजेच केवायसी अपडेट करत आहेत. जर एखाद्या ग्राहकानं केवायसी अपडेट केलं नसेल तर बँक त्या खात्यातील कामकाज थांबवलं जाऊ शकतं. पीएनबीमध्ये अजूनही सुमारे सव्वातीन लाख खातेदार आहेत, ज्यांनी यावर्षी ३१ मार्चपर्यंत केवायसी अपडेट केलेलं नाही. बँकेनं त्यांना केवायसी लवकर अपडेट करण्यास सांगितलं आहे.
न केल्यास काय होईल?
१२ ऑगस्टपर्यंत ज्यांनी केवायसी केलं नाही, त्यांचं खातं निष्क्रिय होईल, असं बँकेचं म्हणणं आहे. म्हणजेच अशा ग्राहकांचं अकाऊंट फ्रीज होईल. त्यानंतर ते आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही. मात्र, त्यांची इच्छा असेल तर तो आपल्या खात्यात पैसे जमा करू शकतील. इतकंच नाही तर, तुम्ही त्या खात्यावरून लोनही घेऊ शकणार नाही.
कसं कराल केवायसी?
पीएनबीनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आपल्या शाखेत जाऊन आपले नवे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, नवा फोटो, पॅन, उत्पन्नाचा पुरावा, मोबाइल नंबर (उपलब्ध असल्यास) किंवा इतर कोणतीही केवायसी माहिती सादर करावी. बँक त्याची पडताळणी करून केवायसी करतील. ग्राहक पीएनबी वन, इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस (आयबीएस), नोंदणीकृत ईमेलद्वारेही हे करू शकतात. त्यांची इच्छा असल्यास ते स्वत: आपल्या घराजवळील पीएनबीच्या इतर कोणत्याही शाखेत जाऊन १२ ऑगस्टपर्यंत केवायसी करू शकतात.