Lokmat Money >बँकिंग > रिझर्व्ह बँकेची 'या' खासगी बँकेवर कारवाई, मोठा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँकेची 'या' खासगी बँकेवर कारवाई, मोठा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आता आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेनं दंड ठोठावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:54 PM2024-11-09T13:54:25+5:302024-11-09T13:54:25+5:30

बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आता आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेनं दंड ठोठावला आहे.

RBI action against south indian bank private sector bank 59 lakh rs What will be the impact on consumers | रिझर्व्ह बँकेची 'या' खासगी बँकेवर कारवाई, मोठा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँकेची 'या' खासगी बँकेवर कारवाई, मोठा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आरबीआयनं एसबीआय, पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी सारख्या अनेक मोठ्या बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं आता नियमांचं पालन न केल्याबद्दल भारतातील खासगी बँक साऊथ इंडियन बँकेला (South Indian Bank) दंड ठोठावलाय. साऊथ इंडियन बँकेनं ठेवीवरील व्याजदर आणि ग्राहक सेवेशी संबंधित काही नियमांचं पालन केलं नाही, ज्यामुळे आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला लाखो रुपयांचा दंड ठोठावलाय.

५९ लाखांचा दंड

आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला संपूर्ण ५९.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेनं बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत मूल्यमापनासाठी वैधानिक चौकशी केली होती. त्यानंतर निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आणि संबंधित पत्रव्यवहाराबद्दल आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला नोटीस बजावली होती. 

नोटीसला बँकेने दिलेलं उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी म्हणणं विचारात घेतल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे वाटले, त्यानंतर आरबीआयने बँकेला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय आहे प्रकरण?

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांना एसएमएस/ ईमेल किंवा पत्राद्वारे माहिती न देता मिनिमम बॅलन्स/ एव्हरेज बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड आकारला होता. हा दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि याचा हेतू बँकेकडून आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या देवाणघेवाणीवर किंवा वैधतेवर कोणताही परिणाम करणारा असून नये, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, जर तुम्ही साऊथ इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Web Title: RBI action against south indian bank private sector bank 59 lakh rs What will be the impact on consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.