Lokmat Money >बँकिंग > 'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश

'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश

Systemaically Important Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील आघाडीच्या ३ बँकांचा समावेश डी-एसआयबीच्या श्रेणीत केला आहे. या बँकांच्या अपयशाचा मोठा परिणाम होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:42 PM2024-11-13T16:42:19+5:302024-11-13T16:43:01+5:30

Systemaically Important Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील आघाडीच्या ३ बँकांचा समावेश डी-एसआयबीच्या श्रेणीत केला आहे. या बँकांच्या अपयशाचा मोठा परिणाम होऊ शकतो.

rbi declared sbi hdfc and icici bank as safest banks of india dsibs list | 'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश

'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश

Domestic Systemaically Important Bank : देशाच्या आर्थिक उभारणीत बँक आणि वित्तीय संस्थांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अर्थव्यवस्थेत काही बँका सिहांचा वाटा उचलत असतात. अशाच ३ आघाडीच्या बँकांबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि दोन खाजगी क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआई बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांची पुन्हा महत्त्वाच्या देशांतर्गत बँका (D-SIBs) म्हणून निवड करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SBI, ICICI बँक आणि HDFC बँकेचा (D-SIB) श्रेणीमध्ये समावेश केला आहे.

कोणती बँक कोणत्या श्रेणीत?
डी-एसआयबीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी बँकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. या श्रेणीत असलेल्या बँकांना भांडवल संवर्धन बफरसह हायर कॉमन इक्विटी टियर 1 (CET1) राखणे आवश्यक आहे. SBI बकेट ४ मध्ये समाविष्ट असून बँकेला यादीनुसार ०.८० टक्के अतिरिक्त सामान्य इक्विटी टियर १ राखावे लागेल. HDFC बँख बकेट २ मध्ये समाविष्ट केली आहे. तिला ०.४० टक्के सामान्य इक्विटी टियर १ राखावी लागेल. तर ICICI बकेट १ मध्ये समाविष्ट आहे. बँकेला ०.२० टक्के CET १ बफर ठेवावा लागेल. RBI ने सांगितले की SBI आणि HDFC बँकेसाठी D-SIB अधिभार १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल.

SIB अशा बँका आहेत ज्या टू बिग टू फेल (TBTF) च्या श्रेणीत येतात. या बँकांच्या अपयशाचा मोठा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. TBTF स्थितीमुळे फेल झाल्यास सरकार अशा बँकांना मदत करते. आरबीआयने २०२३ मध्ये या ३ बँकांचा D-SIB श्रेणीमध्ये समावेश केला होता. सध्याचे अपडेट ३१ मार्च २०२४ पर्यंत बँकांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.

D-SIBs ची संकल्पना २०१४ मध्ये लागू
भारतीय रिझर्व्ह बँकेने १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये देशांतर्गत प्रणालीसाठी महत्त्वाच्या बँकांची यादी तयार करण्याची संकल्पना आखली. २०१५ मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नंतर पुढील वर्षी म्हणजे २०१६ मध्ये, ICICI बँकेला या यादीत स्थान देण्यात आले. एचडीएफसी बँकेने २०१७ मध्ये या यादीत प्रवेश केला.

Web Title: rbi declared sbi hdfc and icici bank as safest banks of india dsibs list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.