Lokmat Money >बँकिंग > RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर कार्ड्स 2023 मध्ये शक्तिकांत दास यांना मोठा सन्मान मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 04:43 PM2023-10-16T16:43:42+5:302023-10-16T16:44:16+5:30

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर कार्ड्स 2023 मध्ये शक्तिकांत दास यांना मोठा सन्मान मिळाला आहे.

RBI Governor Shaktikanta Das : Shaktikanta Das Got A Plus Rank In Global Finance Central Banker Report Card | RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा परदेशात सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळाला A+ रँक


RBI Governor Shaktikanta Das :रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोठा सन्मान मिळाला आहे. मोरोक्कोतील माराकेश शहरात आयोजित ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर कार्ड्स 2023 मध्ये दास यांना 'A+' रँक देण्यात आला आहे. शनिवारी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल हा सन्मान दिला जातो.

उत्कृष्ट कामगिरीसाठी A+ ग्रेड 
ग्लोबल फायनान्स मॅगझिन जगातील केंद्रीय बँकर्सवर अहवाल तयार करते. हा अहवाल A ते F ग्रेड पर्यंत तयार केला जातो. हे ग्रेड उत्कृष्ट कामगिरीपासून अपयशापर्यंतची माहिती देतात. A+ रँक मिळवणे उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाते. तर, F ग्रेड अपयश दर्शवतो. महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनाच्या आधारे A ते F पर्यंतचे ग्रेड दिले जातात.

या बँकर्सनाही A+ ग्रेड मिळाला 
शक्तिकांत दास यांच्यासोबत, इतर दोन केंद्रीय बँकर – स्वित्झर्लंडचे थॉमस जे आणि व्हिएतनामचे जॉर्डन होआंग यांनाही ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये 'A+' ग्रेड मिळाले आहेत. सप्टेंबर महिन्यातच या सन्मानाची घोषणा करण्यात आली होती.
 

Web Title: RBI Governor Shaktikanta Das : Shaktikanta Das Got A Plus Rank In Global Finance Central Banker Report Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.