Join us

देशातील या मोठ्या सरकारी कंपनीला RBI चा दणका, ठोठावला मोठा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 3:00 PM

नियमांचं पालन न केल्याचं म्हणत ठोठावला दंड.

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमांचे पालन करण्यास सक्षम नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. एलआईमध्ये गुंतवणूक करणारे ग्राह आणि एसेट्समध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर फ्लोटीग चार्ज लावण्यात अयशस्वी ठरल्यामुळे नॅशनल हाऊसिंग बँकेच्या सेक्शन 29 बी चं पालन करण्यास अयशस्वी ठरल्याने हा दंड ठोठावल्याचे आरबीआयनं सांगितलं.

यासोबतच एलआयसी हाऊसिंग फायनॅन्सप्रमाणे चार्जला रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे नोंदणीही केली नव्हती. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने एलआयसी हाऊसिंग फायनॅन्सला एक नोटिसही पाठवली होती आणि का दंड ठोठावण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती.

यानंतर रिझर्व्ह बँकेनं एलआयसी हाऊसिंगवर पाच लाखांचा दंड ठोठावला. यासोबतच नियमांचं पालन करण्यात अयशस्वी ठरल्यानं आरबीआयनं म्हैसूर मर्चंट्स बँक लिमिटेडलाही पाच लाखांचा दंड ठोठावला. याशिवाय नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत वक्रांगी लिमिटेडलाही 1.76 कोटींचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकएलआयसी