Lokmat Money >बँकिंग > RBI MPC : आरबीआयकडून तुर्तास दिलासा नाहीच, ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

RBI MPC : आरबीआयकडून तुर्तास दिलासा नाहीच, ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. यामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:08 AM2024-02-08T10:08:46+5:302024-02-08T10:09:01+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. यामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेली नाही.

RBI MPC No immediate relief wait for EMIs to come down Repo rates as they were shaktikanta das | RBI MPC : आरबीआयकडून तुर्तास दिलासा नाहीच, ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

RBI MPC : आरबीआयकडून तुर्तास दिलासा नाहीच, ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. यानंतर गुरुवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी रपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग सहाव्यांदा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास तरी कर्जदारांचा ईएमआय कमी होणार नाही. यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
 

गुरुवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली. यानंतर या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची दास यांनी माहिती दिली. दरम्यान, यावेळी महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचं लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अर्थव्यवस्थेतील कायम राहणार असल्याचं दास म्हणाले. दरम्यान,२०२४ ममध्ये महागाई आणखी कमी होण्याची शक्यता यावेळी दास यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे व्याजदर कपात आता या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतच होण्याची शक्यता आहे. या पतधोरण आढाव्यात व्याज कपात शक्य नाही. याचे मुख्य याचे मुख्य कारण विदेश व्यापारातील अडथळे हे असल्याचं यापूर्वी तज्ज्ञांनी म्हटलं होतं.
 

कपातीसाठी प्रतीक्षा कधीपर्यंत?
 

एसबीआय रिसर्चनं जारी केलेल्या ‘इकोरॅप’ नामक अहवालात म्हटलं आहे की, जून २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात कपात केली जाऊ शकते. ऑगस्ट २०२४ व्याजदर कपातीसाठी सर्वाधिक आदर्श वेळ असेल, असं दिसून येत आहे.

Web Title: RBI MPC No immediate relief wait for EMIs to come down Repo rates as they were shaktikanta das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.