RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याबद्दल ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी सांगितले की, त्यांनी ICICI बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेला 'कर्ज आणि अग्रिम- वैधानिक आणि इतर निर्बंध' आणि 'व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे फसवणूक वर्गीकरण आणि अहवाल' संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझव्र्ह बँकेने आणखी एका निवेदनात म्हटले की, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर हा दंड 'बँकांकडून वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहिता', 'बँकांनी गुंतवलेले रिकव्हरी एजंट', 'बँकांमधील ग्राहक सेवा' आणि ' क्रेडिट आणि अॅडव्हान्स - 'वैधानिक आणि इतर निर्बंध' संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे.