देशात डिजिटल बँकिंग वाढल्यामुळे ATM चा वापर कमी झाला असला तरी एका गोष्टीने तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते म्हणझे अजूनही देशातील बँक ग्राहकांच्या बहुतांश तक्रारी केवळ एटीएम किंवा डेबिट कार्डशी संबंधित आहेत. बँकांवर देखरेख ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) आकडेच सारी माहिती देत आहेत.
RBI ने बँकिंग किंवा बँकिंग सेक्टरशी निगडीत कोणत्याही प्रोडक्टशी निगडीत ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी 'बँकिंग लोकपाल'ची एक प्रणाली बनवली आहे. १ एप्रिल ते ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशभरातील बँक लोकपालला एटीएम/डेबिट कार्डशी संबंधित बँक ग्राहकांकडून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
तक्रारींची संख्या ९.३९ टक्क्यांनी वाढलीआरबीआयने बुधवारी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, लोकपाल योजना किंवा केंद्रीय बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाला २०२१-२२ मध्ये ४,१८,१८४ तक्रारी प्राप्त झाल्या. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९.३९ टक्के अधिक आहे. बँकिंग लोकपाल कार्यालयाने यापैकी ३,०४,४९६ तक्रारी हाताळल्या.
एटीएम/डेबिट कार्डबद्दल सर्वाधिक तक्रारीआरबीआयच्या अहवालातील माहितीनुसार एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी १४.६५ टक्के एटीएम/डेबिट कार्डशी संबंधित होत्या. तर १३.६४ टक्के मोबाइल/इलेक्ट्रॉनिक बँकिंगशी संबंधित होत्या. या सर्व तक्रारींपैकी सुमारे ९० टक्के तक्रारी ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) पोर्टल, ई-मेल आणि सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टम (CPGRAMS) या डिजिटल माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.