Join us

Gold Loan देण्याबाबत RBIचा नवा इशारा; सोन्याचे मूल्य ठरविण्यात सावध राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 11:46 AM

Gold Loan RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनटेक स्टार्टअप्सद्वारे सोन्यावर कर्ज देण्याबाबत बँकांना सतर्क केलं.

Gold Loan RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनटेक स्टार्टअप्सद्वारे सोन्यावर कर्ज देण्याबाबत बँकांना सतर्क केले. आरबीआयने सोन्याच्या किमती ठरविण्याबाबतच्या विशेषतः गोल्ड लोन कंपन्यांचे फिल्ड एजंट काम करत असलेल्या प्रकरणांमध्ये सावध राहण्यास सांगितले आहे. देशात रुपीक, इंडिया गोल्ड आणि ओरो मनीसारख्या अनेक कंपन्या आहेत, ज्या बँका आणि एनबीएफसीसाठी गोल्ड लोन देतात. 

आयआयएफएल फायनान्सच्या सुवर्ण कर्ज व्यवसायावरील नियामक कारवाईनंतर सुवर्ण कर्ज पुरवठादारांसाठी आरबीआयने हा इशारा दिला आहे.

 

धोक्याचे संकेत...

  • रुपीकचे सुमित मणियार म्हणाले की, बँकांनी फिनटेकच्या माध्यमातून सोन्याची कर्जे बंद केलेली नाहीत.
  • नियमांनुसार, सोन्याच्या मूल्याच्या ७५% पर्यंत कर्ज दिले जाऊ शकते; परंतु अनेक कंपन्या, सोन्याच्या कर्जाव्यतिरिक्त, ग्राहकांच्या कर्जाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज देखील देतात, हे रिझर्व्ह बँकेसाठी धोक्याचे संकेत आहेत.
टॅग्स :सोनंभारतीय रिझर्व्ह बँक