भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBO) ३० सप्टेंबर रोजी रेपो दरात वाढ करत कर्जदारांना मोठा धक्का दिला. एका झटक्यात दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढला आहे. या वर्षी मे महिन्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची ही चौथी वेळ आहे. या वर्षी मे ते सप्टेंबरपर्यंत रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. यासह, रेपो दर ५.९% या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. रेपो दर वाढवण्याचा सर्वात मोठा परिणाम गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे दिसून येत आहे. ३० सप्टेंबरनंतर अनेक बँकांनी गृहकर्ज किंवा उर्वरित कर्ज महाग केलं आहे. रेपो रेटशी जोडलेली कर्ज, त्यांचे दर त्वरित लागू होतात. अशा परिस्थितीत कोणती बँक ग्राहकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कोटक महिंद्रा बँक -
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना किमान ७.५० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कर्जाच्या ०.५० टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) म्हणून भरावी लागेल.
सिटी बँक -
सिटी बँक ग्राहकांना किमान ६.६५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. प्रक्रिया शुल्क म्हणून १०,००० रुपये भरावे लागतील.
युनियन बँक ऑफ इंडिया -
युनियन बँक ऑफ इंडिया ७.९० टक्के प्रास्ताविक दराने गृहकर्ज देत आहे. प्रोसेसिंग फीची माहिती बँकेच्या शाखेला भेट देऊन घेता येईल.
बँक ऑफ बडोदा -
बँक ऑफ बडोदा ७.४५% च्या प्रास्ताविक दराने गृहकर्ज प्रदान करत आहे. प्रोसेसिंग फीची माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल.
सेंट्रल बँड ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७.२० टक्के ते ७.६५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. २०,००० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
एचडीएफसी होम -
एचडीएफसी होम लोन आपल्या ग्राहकांना ८.१० टक्के प्रास्ताविक दराने कर्ज देत आहे. कर्जाच्या रकमेच्या ०.५% किंवा रु. ३,००० यापैकी जे जास्त असेल ते प्रक्रिया शुल्क म्हणून आकारले जाईल.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स -
एलआयसी हाऊसिंग फायनान्स 7.55 टक्के प्रारंभिक दराने गृहकर्ज देत आहे. प्रक्रिया शुल्कासाठी 10,000 ते 15,000 रुपये भरावे लागतील.
अॅक्सिस बँक - अॅक्सिस बँक त्यांच्या ग्राहकांना 7.60% च्या प्रास्ताविक दराने गृहकर्ज देत आहे. 10,000 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.