Lokmat Money >बँकिंग > आरबीआयची कारवाई; SBI बँकेला 1.3 कोटी रुपयांचा दंड, नेमकं कारण काय..?

आरबीआयची कारवाई; SBI बँकेला 1.3 कोटी रुपयांचा दंड, नेमकं कारण काय..?

आरबीआयने SBI सह इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेलाही कोट्यवधीचा दंड ठोठावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 08:52 PM2023-09-25T20:52:43+5:302023-09-25T20:53:28+5:30

आरबीआयने SBI सह इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेलाही कोट्यवधीचा दंड ठोठावला आहे.

reserve-bank-of-india-imposes-penalty-of-crores-on-sbi-indian-bank-and-punjab-sind-bank | आरबीआयची कारवाई; SBI बँकेला 1.3 कोटी रुपयांचा दंड, नेमकं कारण काय..?

आरबीआयची कारवाई; SBI बँकेला 1.3 कोटी रुपयांचा दंड, नेमकं कारण काय..?

RBI on SBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयला (SBI) 1.3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक, या आणखी दोन सरकारी बँकांनाही कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, आरबीआयने 'कर्ज आणि अॅडव्हान्स' संदर्भात वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत एक नियमावली तयार केली आहे. तसेच,  इंट्रा-ग्रुप ट्राझॅक्शन व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या दोन्ही नियमांचे योग्य पालन करण्यात SBI अयशस्वी ठरली, त्यामुळे 1.3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI ने 'कर्ज आणि अॅडव्हान्स लोन' नियम, KYC संबंधित नियम आणि ठेवींवरील व्याज दरासंबंधी RBI मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल इंडियन बँकेला 1.62 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. याशिवाय डिपॉझिटर एजुकेशन  आणि अवेअरनेस फंड स्कीमशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल पंजाब आणि सिंध बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय, आरबीआयने NBFC क्षेत्रातील कंपनी Fedbank Financial Services Limited वर 8.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. फसवणूक रोखण्यासंबंधी काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

या बँकेचा परवाना रद्द केला
मुंबईच्या 'द कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'चा परवाना रद्द केल्याची माहितीही आरबीआयने दिली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आणि उत्पन्नाची आशा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांचे फारसे नुकसान होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे, कारण बँकेच्या 96.09 टक्के ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत. 

 

Web Title: reserve-bank-of-india-imposes-penalty-of-crores-on-sbi-indian-bank-and-punjab-sind-bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.