Lokmat Money >बँकिंग > रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:58 PM2024-11-07T15:58:27+5:302024-11-07T16:02:23+5:30

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे.

rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices | रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत दिवसेंदिवस भारतीय रुपया घसरत चालला आहे. सलग दुसऱ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.३० रुपये प्रति डॉलर इतका घसरला आहे, जो त्याचा ऐतिहासिक निचांक आहे. भारतीय बाजारपेठेकडे विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने मोठ्या प्रमाणात निधी बाहेर गेला आहे. याचा परिणाम थेट भारतीय चलनावर झाला असून भारतीय रुपया निचांकी पातळीवर जात आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरचे मूल्य आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे रुपया आणखी खाली जाण्याची भीती कायम राहील.

बुधवारी रुपया सर्वकालीन निचांकी पातळीवर बंद
बुधवारी, रुपया डॉलरच्या तुलनेत ८४.२८ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. चलन तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर, कर कपात आणि नियंत्रणमुक्तीनंतर अमेरिकेच्या वाढीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. यामुळे जगातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरची किंमत जास्त असेल. परदेशी गुंतवणूकदार डॉलरला पसंती देतील. याशिवाय, दरवाढीचा परिणाम आणि शुल्क वाढीमुळे युरो आणि इतर आशियाई चलनांमध्येही घसरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय रुपयासाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

डॉलर निर्देशांकात नवीन घसरण
आज डॉलर निर्देशांकात घसरण दिसून येत आहे, ज्यामुळे तो ०.१ टक्क्यांनी घसरून १०४.९ च्या पातळीवर आला आहे. डॉलर इंडेक्स हा एक निर्देशांक आहे, जो जगातील ६ चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवतो. बुधवारी हा निर्देशांक १०५.१२ पर्यंत खाली आला होता, जो ४ महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. 

रुपयाच्या घसरणीचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
रुपयाच्या कमजोरीमुळे भारतासाठी नवीन अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. डॉलर मजबूत झाला म्हणजे भारताचे आयात मूल्य थेट वाढेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये १ डॉलरसाठी ८३ रुपये द्यावे लागेत होते, तर आता ही रक्कम ८४.३० रुपये होईल. भारत परदेशातून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो. डॉलर महाग झाल्यामुळे ते विकत घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

भारतात अनेक गोष्टी महागणार?

  • कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारताला त्याच्या आयातीवर अधिक खर्च करावा लागणार आहे. परिणामी देशातील अनेक वस्तूंच्या किंमती महाग होणार आहेत.
  • डॉलरच्या मूल्यवृद्धीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. कारण भारताचा परकीय चलन साठा, जो ७०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे, त्यात घट होण्याची शक्यता आहे.
  • कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही परिणाम होऊ शकतो, कारण त्याचा वापर इंधनासाठी कच्चा माल म्हणून केला जातो.
     

Web Title: rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.