Join us  

SBI सह 3 बँकांनी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार पूर्वीपेक्षाही अधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 7:26 PM

बँकेत डिपॉझिट करून व्याजाच्या माध्यमाने नफा कमावणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. 

SBI सह देशातील 3 मुख्य बँकांनी ग्राहकांच्या ठेवींवर म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. बँकेत डिपॉझिट करून व्याजाच्या माध्यमाने नफा कमावणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. 

अॅक्सिस बँक - प्रायव्हेट सेक्टरमधील अॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटवरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने डिपॉझिटच्या दरात 0.45 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. बँकेने 17 महिन्यांपासून ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी एफडीच्या व्याजदरात 45 बेसिस पॉइंट वाढवले आहेत. आता नवे दर 5.60 टक्यांवरून 6.05 टेक्के झाला आहे. हे दर 11 ऑगस्टपासून लागू आहेत. यापूर्वी बँकेने 16 जुलैला एफडीवर व्याजदरात वाढ केली होती. 

एसबीआय- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिटवर बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी 15 बेसिस पॉइंट व्याज वाढवले आहे. आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना  2.90 टक्क्यांपासून ते 5.65 टक्के दराने व्याज मिळेल. वरिष्ठ नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या डिपॉझिटवर 3.40 टक्के ते 6.45 टक्क्यांपर्यंत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया-  सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षाही कमीच्या डिपॉझिटवरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आता 2.75 टक्क्यांपासून ते 5.55 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हा व्याजदर 7 दिवसांपासून ते 555 दिवसांपर्यंतच्या मैच्युरिटीवर आहे. 

टॅग्स :बँक ऑफ इंडियाबँकएसबीआयगुंतवणूक