आपलं स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरांच्या वाढत्या किंमती पाहता बहुतेक लोक आपलं हे स्वप्न बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पूर्ण करतात. तुम्ही कर्ज घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर 65 बेसिस पॉइंट्सपर्यंत सूट देत आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय, नॉन सॅलराईड आणि एम्पलॉईड हाऊसहोल्डसाठी लागू आहे. या सुविधेचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. दरम्यान, बँकेचा सध्याचा एक्स्टर्नल बेंचमार्क दर (EBR) 9.15 टक्के आहे.सिबिल स्कोअर 750-800ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 750-800 आणि त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना व्याजदरावर 55 बेसिस पॉईंट्सची सूट मिळत आहे. यानंतर ग्राहकांना 8.60 टक्के व्यादरानं कर्ज मिळेल.
सिबिल स्कोअर 700-749दुसरीकडे 700-749 दरम्यान सिबिल स्कोअर असेल तर तुम्हाला 65 बेसिस पॉईंट्सची सूट मिळेल. यानंतर तुम्हाला 8.70 टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. सध्या विना सूट हा व्याजदर 9.35 टक्के आहे.
सिबिल स्कोअर 650 - 699 ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 650-699 दरम्यान आहे त्यांना व्याजदरात कोणतीही सूट मिळणार नाही. ज्यांचा सिबिल स्कोअर 550-649 दरम्यान असेल त्यांना 30 बेसिस पॉईंट्सची सूट मिळेल. सूट मिळाल्यानंतर हा व्याजदर 9.45 टक्के असेल. विना सूट हा व्याजदर 9.65 टक्के आहे.
सिबिल स्कोअर 151-200151-200 दरम्यान सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्जावर 65 बेसिस पॉईंट्सची सूट मिळणार आहे. प्रस्तावित व्याजदर 8.70 टक्के (ईबीआर - 0.45 टक्के) आहे. विना सूट हा व्याजदर 9.35 टक्के (ईबीआर 0.50 टक्के) असेल.
प्रोसेसिंग फीहोमलोनसाठी किमान २ हजार रुपये आणि जीएसटी आणि कमाल १०००० रुपये आणि जीएसटी किंवा लोन अमाऊंटच्या 0.35 टक्के प्रोसेसिंग फी आकारण्यात येईल.