Join us

Cashback SBI Card : एसबीआयच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कॅशबॅक कार्ड लाँच, खरेदीवर मिळेल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 2:54 PM

Cashback SBI Card : कॅशबॅक एसबीआय कार्डचे अनेक फायदे आहेत, जसे की कार्डधारक आता कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी करून 5 टक्के कॅशबॅक सहज मिळवू शकतात.

नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने  (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या कार्डचे नाव कॅशबॅक एसबीआय कार्ड (SBI Credit Card) आहे. या कार्डद्वारे, तुम्हाला कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवर 5 टक्के कॅशबॅक (5% Cashback on Shopping) आवश्य मिळणार आहे. तसेच, यात व्यापाऱ्यांवर कोणतेही बंधन असणार नाही.

कॅशबॅक एसबीआय कार्डचे अनेक फायदे आहेत, जसे की कार्डधारक आता कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी करून 5 टक्के कॅशबॅक सहज मिळवू शकतात. तसेच, ऑफलाइन शॉपिंगवरही ग्राहकांना या कॅशबॅकचा लाभ मिळतो. अशा स्थितीत तुम्हाला कंपनीच्या कोणत्याही अटीशिवाय प्रत्येक खरेदीवर कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो, असा दावा बँकेकडून करण्यात आला आहे. 

बँकेने म्हटले आहे की, जर ग्राहकाला 1,000 रुपयांपेक्षा कमी खरेदीवर 1 टक्के कॅशबॅक मिळेल. दुसरीकडे, तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या कार्डमध्ये ग्राहकांना ऑटो क्रेडिट कॅशबॅक सुविधा (Auto Credit Cashback Facility)मिळते. अशा परिस्थितीत खरेदी केल्यानंतर दोन दिवसांत कॅशबॅकची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

हे कार्ड लाँच करताना बँकेचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणाले की, कॅशबॅक एसबीआय कार्ड ग्राहकांचा पोर्टफोलिओ मजबूत करण्यास मदत करेल. हे बँकेने अतिशय विचारपूर्वक सुरू केले आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना प्रत्येक खरेदीनंतर कॅशबॅक मिळवण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत सणासुदीच्या या मोसमात ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

किती द्यावे लागेल वर्षाला शुल्क!कॅशबॅक एसबीआय कार्ड खरेदी केल्यावर तुम्हाला एका वर्षात 999 रुपये नूतनीकरण शुल्क भरावे लागेल. या कार्डद्वारे ग्राहक दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात. जर तुम्ही एका वर्षात 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी करत असाल तर तुम्हाला या कार्डचे नूतनीकरण शुल्क भरावे लागणार नाही. या कार्डवर, तुम्हाला इंधन अधिभारावर 1 टक्के कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयव्यवसाय