Lokmat Money >बँकिंग > एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर?

एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर?

sbi made loans cheaper : तुम्ही या सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया चांगली ऑफर देत आहेत. एसबीआयने व्याजदर कपात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:05 PM2024-10-15T15:05:07+5:302024-10-15T15:06:56+5:30

sbi made loans cheaper : तुम्ही या सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया चांगली ऑफर देत आहेत. एसबीआयने व्याजदर कपात केली आहे.

sbi made loans cheaper for a limited period take loan at low interest | एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर?

एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर?

sbi made loans cheaper : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा दिवसांत लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यासाठी अनेकजण कर्जही घेतात. आता सणासुदीच्या काळात कर्ज घेण्याची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मर्यादित कालावधीसाठी व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. बँकेने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कर्जदारांसाठी MCLR मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने या कालावधीत कर्जावरील MCLR व्याज दर २५ बेस पॉइंट्स (BPS) ने कमी केला आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

कुठे व्याजदर कपात केली?
एमसीएलआर आधारित दर ८.२०% ते ९.१% च्या श्रेणीत आहेत. ओव्हरनाइट एमसीएलआर ८.२०% आहे, तर एका महिन्याचा दर ८.४५% वरून ८.२०% पर्यंत कमी झाला आहे. यामध्य २५ बीपीएसची कपात आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.८५% वर सेट केला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर 8.95% वर सुधारित करण्यात आला आहे. . दोन वर्षांचा एमसीएलआर ९.०५% आहे आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ९.१% आहे.

कालावधी सध्याचा MCLR (%)अपडेटेड MCLR (%)
एक रात्री ८.२८.२
एक महिना८.४५८.२
तीन महिने ८.५८.५
सहा महिने ८.८५८.८५
एक वर्ष ८.९५८.९५
दोन वर्ष ९.५९.५
तीन वर्ष  ९.१९.१

 

एमसीएलआर म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड-आधारित लेंडिंग रेट (MCLR) हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) निश्चित केलेला बँकांसाठी अंतर्गत संदर्भ दर आहे. हे विविध प्रकारच्या कर्जावरील किमान व्याजदर परिभाषित करण्यात बँकांना मदत करते. बँका MCLR खाली कर्ज देऊ शकत नाहीत किंवा त्यांना कठोर नियामक कारवाईला सामोरे जावे लागेल. एसबीआय होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) ९.१५% आहे. आरबीआय रेपो दर ६.५०+ स्प्रेड (२.६५%) आहे. गृहकर्जावरील व्याजदर कर्जदाराच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असून तो ८.५०% ते ९.६५% दरम्यान बदलू शकतात.

Web Title: sbi made loans cheaper for a limited period take loan at low interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.