फेस्टीव्ह ऑफरनंतर आता लोन देण्याच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बैंक ऑफ इंडियाने 'Campaign rates' नावाने एक नवी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत एसबीआय होम लोनच्या व्याज दरावर 30 ते 40 बीपीएसची सूट देत आहे. ही ऑफर 31 मार्च पर्यंतच आहे. एवढेच नाही, तर एसबीआयने रेग्युलर आणि टॉप-अप होम लोनवरील प्रोसेसिंग फीसदेखील माफ केली आहे.
नव्या ऑफरनुसार, एसबीआय आपल्या ग्राहकांना रेग्युलर होम लोनवर 8.60% व्याज ऑफर करत आहे. महत्वाचे म्हणजे, एसबीआयचे होम लोन रेट क्रेडिट स्कोरच्या आधारे वेगवेगळे असतात.
रेग्युलर होम लोन -
SBI होम लोनवर जास्तीत जास्त सवलत देत आहे. येथे 30 ते 40 bps ची सूट आहे. मात्र, ही सवलती 700 ते 800 पेक्षा अधिक अथवा हिच्या बरोबरीच्या क्रेडिट स्कोअरवर लागू आहेत.
एसबीआयच्या या ऑफर अंतर्गत होम लोनवरील व्याज दर 8.60% आहे. 800 हून अधिक अथवा एवढ्याच सिबिल स्कोरवर 8.90% टक्क्यांच्या सर्वसामान्य दाराप्रमाणे 30 बीपीएसची सूट आहे. बँक प्रत्येक 750 च्या क्रेडिट स्कोरवर 40 बीपीएस एवढी सवलत ऑफर करत आहे. याशिवाय 799 आणि 700 ते 749 दरम्यान क्रेडिट स्कोर असेल तर अनुक्रमे 9% आणि 9.10% एवढ्या सामान्य दराच्या तुलनेत 8.60% आणि 8.70% च रेट ऑफ इंट्रेस्ट लागेल. महत्वाचे असे की, एसबीआय होम लोनवर 30 बीपीएसची सवलत अशा लोकांनाही देत आहे, ज्यांचा स्कोर "NTC/NO CIBIL/-1" ग्रेड मध्ये आहे. अशा लोकांना 8.80 टक्के व्याज लागेल, तसेच यांच्यासाठी नॉर्मल रेट 9.10 टक्के आहे.
टॉप-अप लोन:
एसबीआयने 700 पेक्षा अधिक अथवा 800 एवढ्या क्रेडिट स्कोरवर 30 बीपीएसची सूट देण्याची घोषणा केली आहे. यानुसार, एसबीआयचा टॉप-अप लोन रेट 9.30% दरानुसार, 800 हून अधिक अथवा त्याच्या बराबरोरीच्या स्कोरवर 9% एवढा आहे. तर, 750-799 च्या स्कोरवर हा दर 9.10% ते 9.40% दरापेक्षा कमी म्हणजेच 9.10% आहे. तसेच, 700-749 च्या क्रेडिट स्कोरवर 9.20% एवढे व्याज आहे.
650-699 च्या स्कोरवर 9.60%, 550-649 च्या स्कोरवर 9.90% आणि NTC/NO CIBIL/-1 स्कोरवर 9.50% दर येथेही बदललेला नाही. याशिवाय एसबीआय 750 पेक्षा अधिक या बरोबरीत सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना मॅक्सगॅन आणि रियल्टी लोनसाठी (सीआरई कर्ज सोडून) कार्ड दरावर 5 बीपीएस सवलत देत आहे.