SBI Bank Festive Season Offer: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं (SBI) ग्राहकांना खास ऑफर आणली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या सणासुदीच्या हंगामातील ऑफरचा भाग म्हणून त्यांच्या कार लोनवरील प्रोसेसिंग फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आता तुम्हाला कार लोन घेण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ही ऑफर ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तुम्हाला कार लोन घेण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. यासंदर्भात बँकेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहितीही शेअर केलीये.
कार लोन ऑफरबँकेच्या वेबसाइटनुसार, एसबीआय ऑटो लोनवर एक वर्षाचा एमएलसीआर लागू करते, जो ८.५५ टक्के आहे. एसबीआय कार लोनवर ८.८० टक्के ते ९.७० टक्क्यांपर्यंत व्याज आकारते. सीआयसी स्कोअरनुसार हे व्याजदर निरनिराळे असू शकतात. फिक्स्ड रेट व्याजामध्ये संपूर्ण कर्जाच्या कालावधीत व्याजदर समान राहतात. याशिवाय कार लोनचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर व्याजदर जास्त असू शकतो. व्याजाची गणना रोजच्या रिड्युसिंग बॅलन्सवर केली जाते. एक वर्षानंतर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क भरावे लागणार नाही.