Join us  

SBI Saving Account : स्टेट बँकेत उघडा मुलांचे बचत खाते! जाणून घ्या, फायदे आणि खाते उघडण्याची प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 4:56 PM

SBI Savings Account for Children : पहिल्या कॅटगरीचे नाव पहला कदम (SBI Pehla Kadam) आणि दुसऱ्या कॅटगरीचे नाव पहली उड़ान (SBI Pehli Udaan) आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अल्पवयीय मुलांसाठी बचत खाते उघडण्याची सुविधा देत आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांचे पालक सहजपणे खाते उघडू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया  (SBI Saving Account for Children) मुलांना दोन कॅटगरीमध्ये खाती उघडण्याची सुविधा देते. पहिल्या कॅटगरीचे नाव पहला कदम (SBI Pehla Kadam) आणि दुसऱ्या कॅटगरीचे नाव पहली उड़ान (SBI Pehli Udaan) आहे.

ही दोन्ही बचत खाती ग्राहक  (SBI Savings Account Opening Process) घरबसल्या एसबीआय मोबाईल बँकिंग अॅप योनो (SBI YONO) वरून उघडू शकतात. या दोन्ही खात्यांची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही खात्यांमध्ये किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवण्याची कोणतीही अडचण नाही. यासोबतच या खात्यात नेट बँकिंग (Net Banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking) यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. 

पहला कदम बँक बचत खाते (SBI Pehla Kadam Details)पहला कदम बँक बचत खाते कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलासाठी उघडले जाऊ शकते. हे खाते पालक किंवा पालकांसोबत ज्वाइंटरित्या (Joint Account) देखील उघडले जाऊ शकते. फक्त मुलाच्या नावाने खाते उघडता येत नाही. हे खाते मुलगा आणि पालक दोघेही स्वतंत्रपणे ऑपरेट करू शकतात. या खात्यावर, बँक डेबिट कार्ड  (Debit Account) जारी करते, ज्यामधून तुम्ही 5,000 रुपये काढू शकता. या खात्यात तुम्हाला 2,000 रुपयांच्या मोबाईल बँकिंग व्यवहारांची परवानगी मिळते. या खात्यात एक चेक बुक देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 10 चेक आहेत. हे चेकबुक पालकाच्या नावाने दिले जाते. हे खाते उघडताना मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

पहली उड़ान बचत खाते (SBI Pehli Udaan Details)स्टेट बँक पहली उड़ान बचत खाते 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी उघडता येते. हे खाते फक्त मुलांच्या नावाने एकल खाते म्हणून उघडता येते. अल्पवयीन हे खाते एकटे हाताळू शकतात. या खात्यात डेबिट कार्ड सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याची दैनिक मर्यादा 5,000 रुपये आहे. यासोबतच नेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर करता येतील. तसेच, एक चेकबुक (Cheque Book) देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 10 चेक दिले आहेत.

खाते उघडण्याची प्रोसेसतुम्ही स्टेट बँक पहला कदम बचत खाते आणि पहली उडान बचत खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उघडू शकता. ऑनलाईन तुम्ही मोबाईल बँकिंग अॅप योनोवर उघडू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या घराजवळील शाखेत जाऊन खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पालकांचे आधार आणि पॅन आवश्यक असेल.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयव्यवसाय