नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस शुल्क भरावे लागणार नाही. बँकेने जाहीर केले की, मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क माफ करण्यात आले आहे. म्हणजेच एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात.
ट्विटरवर ही माहिती शेअर करताना एसबीआयने म्हटले आहे की, "मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क आता माफ झाले! ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात." याचबरोबर, पुढे म्हटले आहे की ग्राहक पैसे पाठवणे, पैशांची विनंती करणे, अकाउंट बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट पाहणे आणि UPI पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतात.
SMS charges now waived off on mobile fund transfers! Users can now conveniently transact without any additional charges.#SBI#StateBankOfIndia#AmritMahotsav#FundTransferpic.twitter.com/MRN1ysqjZU
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 17, 2022
काय आहे USSD?
यूएसएसडी किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा सामान्यतः टॉक टाइम बॅलन्स किंवा अकाउंटची माहिती तपासण्यासाठी आणि मोबाइल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो. ही सेवा फीचर फोनवर काम करते आणि कोणताही एसबीआय ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतो. फीचर फोन वापरणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
65 टक्क्यांपेक्षा जास्त फीचर फोन ग्राहक
देशातील 1 अब्जाहून अधिक मोबाईल फोन ग्राहकांपैकी 65 टक्क्यांपेक्षा जास्त फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. आता असे ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय व्यवहार आणि इतर गोष्टी करू शकतात.
गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवला प्राइम लेंडिंग रेट
विशेष म्हणजे, अलीकडेच एसबीआयने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 70 बेस पॉईंट्सने वाढवला होता. या वाढीसह, एसबीआयच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, सुधारित दर आता 13.45 टक्के आहे. नवीन दर 15 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेने आजपासून लागू होणार्या आधारभूत दरात समान आधार पॉइंटने 8.7 टक्के वाढ केली आहे. दरम्यान, बँक बीपीएलआर आणि बेस रेट दोन्ही त्रैमासिक आधारावर सुधारित करते. येत्या काही दिवसांत इतर बँका देखील एसबीआयकडून कर्जदरात सुधारणा करण्याची शक्यता आहे.