देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँकेत खांदेपालट झाली आहे. चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी हे स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष बनले आहेत. आज दाखल केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये स्टेट बँकेने याची माहिती दिली आहे.
दिनेश खारा हे ६३ वर्षांचे झाल्याने ते निवृत्त झाले आहेत. एसबीआय अध्यक्षपदासाठी ६३ वर्षे ही सर्वाधिक वयोमर्यादा आहे. खारा यांच्यानंतर शेट्टी हे ज्येष्ठ मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते गेली ३६ वर्षे एसबीआयमध्ये आहेत. इंटरनॅशनल बँकिंग, ग्लोबल मार्केट आणि टेक्नॉलॉजी विभागाचे काम ते पाहत होते.
एफएसआयबीने दोन महिन्यांपूर्वी शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली होती. केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या एफएसआयबीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची जबाबदारी असते. यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समिती अखेरचा निर्णय घेते.
SBI ने वाढविले व्याजदर
SBI ने वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये १० बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. नवीन दर आज, गुरुवार, १५ ऑगस्ट २०२४ पासून लागू झाले आहेत. SBI ने MCLR मध्ये वाढ करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.