SBI Bank Scheme: सध्याच्या महागाईच्या काळात बचत करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. कर्जाचे हप्ते आणि रोजचे खर्च यातून बचत कशी वाढवायची असा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. तुम्हीही यापैकीच एक असाल तर चिंता करू नका. कारण, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका योजनेत तुम्ही ४०० दिवसांत श्रीमंत होऊ शकता. विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे. एसबीआयच्या बहुतेक योजना ह्या सर्वसामान्य आणि एनआरआय ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आहेत. याआधी एसबीआयने अमृत कलश आणि एसबीआय वीकेअर योना आपल्या आहेत. अमृत कलश योजना सर्व नागरीक आणि ज्येष्ठांसाठी आहे. तर एसबीआय वी केअर ही विशेष करुन ज्येष्ठांसाठी आहे.
एसबीआय अमृत कलश
एसबीआयची अमृत कलश योजना ही ४०० दिवसांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना ७.१० टक्के वार्षिक व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. एसबीआयच्या बेवसाईटनुसार हे व्याजदर १२ एप्रिल २०२३ पासून लागू आहेत.
एसबीआय वी केअर
एसबीआय वी केअर योजना ही ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन आणण्यात आली आहे. यामध्ये नियमित व्याजदरांवर ५० बेसिस पॉईंटचे (बीपीएस) व्याज मिळते. ही योजना नवीन आणि जमा किंवा रिन्यू दोन्हींसाठी उपलब्ध आहे. या योजनेचीही अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.
एसबीआय अमृत वृष्टी योजना
एसबीआय अमृत वृष्टी योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. या योजनेत तुम्हाला ७.२५ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्त व्याजदर मिळतो. गुंतवणूकदार या योजनेतील रकमेवर कर्जही घेऊ शकतात. या योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत तुम्ही कमाल ३ कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकता.
एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉजिट
एसबीआयने पर्यावरण अनुकूल योजनांचे समर्थन करण्यासाठी ग्रीन टर्म डिपॉजिट योजना लाँच केली आहे. ही ११११ ते १७७७ दिवसांसाठी ६.६५ टक्के व्याजदर गेते. तर २२२२ दिवसांसाठी ६.४० टक्के वार्षिक व्याजदर मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जमा ठेवीवर ७.४० टक्के व्याजदर मिळतो.
एसबीआय सर्वोत्तम योजना
एसबीआय सर्वोत्तम योजना ही विशेष करुन मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. नियमित एफडीपेक्षा यात तुम्हाला अधिक व्याजदर मिळतो. दोन वर्षांचा कालावधी असलेल्या या योजनेत वार्षिक ७.४ टक्के व्याजदर मिळतो. तर ज्येष्ठ नारिकांसाठी .५० टक्के अधिक व्याज मिळते. एसबीआय सर्वोत्तम योजने तुम्ही १ कोटी ते ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.