Lokmat Money >बँकिंग > SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

SBI Home Loan EMI Calculation: जर तुम्ही स्वप्नातील घरासाठी गृहकर्जाचा विचार करत असाल तर व्याजदरांबाबत सविस्तर चौकशी केली पाहिजे. जर तुम्ही एसबीआयमधून होमलोन घेणार असाल तर किती ईएमआय आणि व्याज द्यावं लागेल हे पाहू.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:01 AM2024-05-06T11:01:12+5:302024-05-06T11:02:08+5:30

SBI Home Loan EMI Calculation: जर तुम्ही स्वप्नातील घरासाठी गृहकर्जाचा विचार करत असाल तर व्याजदरांबाबत सविस्तर चौकशी केली पाहिजे. जर तुम्ही एसबीआयमधून होमलोन घेणार असाल तर किती ईएमआय आणि व्याज द्यावं लागेल हे पाहू.

state bank of india Home Loan of rs 30 lakh for 20 years How much will be the EMI how much will you pay interest | SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

SBI Home Loan EMI Calculation: जर तुम्ही स्वप्नातील घरासाठी गृहकर्जाचा (Home Loan) विचार करत असाल तर व्याजदरांबाबत सविस्तर चौकशी केली पाहिजे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयबद्दल बोलायचं झालं तर गृहकर्जासाठी त्याचा सुरुवातीचा व्याजदर ९.१५ टक्के आहे. जर तुम्हाला २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचं कर्ज घ्यायचं असेल तर तुमचा मासिक ईएमआय किती असेल आणि कर्जाच्या कालावधीत तुम्ही किती व्याज देणार आहात हे आज आपण समजून घेऊ.
 

एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, सिबिल स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ग्राहक सुरुवातीच्या ९.१५ टक्के दरानं होम लोन देत आहे. आता समजा तुम्हाला २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घ्यावं लागलं, तर सध्याच्या सुरुवातीच्या व्याजदरानं तुमचा ईएमआय किती असेल. तसेच कर्जाचे व्याजदर संपूर्ण कालावधीत सरासरी सारखेच राहिल्यास तुम्ही किती व्याज द्याल? हे पाहू.
 

  • कर्जाची रक्कम : ३० लाख रुपये
  • कर्जाचा कालावधी : २० वर्षे
  • व्याज दर : ९.१५% वार्षिक
  • ईएमआय: २७,२८२
  • एकूण मुदतीत व्याज: ३५,४७,६४८ रुपये
  • एकूण पेमेंट: ६५,४७,६४८ रुपये

     

त्यामुळे कर्जाची मुदत संपेपर्यंत तुम्ही एकूण ६५,४७,६४८ रुपये फेडाल. यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ३५ लाख ४७ हजार ६४८ रुपयांची रक्कम व्याज म्हणून द्यावी लागणार आहे. दरम्यान, आपल्या सिबिल स्कोअर आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर अवलंबून, आपण गृहकर्जाच्या व्याजदरांबाबत तुम्ही बार्गेन करू शकता. फ्लोटिंग रेटवरील व्याजदर सध्याच्या दरापेक्षा कमी असू शकतात.
 

(टीप : यातील व्याजाची गणना एसबीआय होम लोन कॅलक्युलेटरनुसार करण्यात आलेली आहे.)

Web Title: state bank of india Home Loan of rs 30 lakh for 20 years How much will be the EMI how much will you pay interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.