Join us

SBI मध्ये खातं आहे? खिशाला लागणार कात्री, 'या' डेबिट कार्डांवर शुल्क वाढणार, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 8:50 AM

SBI Annual Maintenance Charges Debit Cards : जर तुमचं स्टेट बँकेत खातं असेल ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. १ एप्रिलपासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

१ एप्रिलपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खातं आहे का? जर तुमचं स्टेट बँकेत खातं असेल ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बँकेनं त्यांच्या काही डेबिट कार्डांशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कामध्ये (Annual Maintenance Charges) बदल केले आहेत. नवीन दर १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. याबाबतची माहिती एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलीये. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या वार्षिक देखभाल शुल्कावर एक नजर टाकूया. 

कोणत्या SBI डेबिट कार्डांच्या शुल्कात बदल? 

क्लासिक डेबिट कार्ड 

क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड्सचं वार्षिक देखभाल शुल्क  १२५ रुपये + जीएसटी ​​वरून २०० रुपये + जीएसटी ​​पर्यंत वाढवले ​​आहेत. 

युवा आणि अन्य कार्ड्स 

युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड (इमेज कार्ड) यांसारख्या डेबिट कार्डांसाठी वार्षिक देखभाल शुल्क १७५ रुपये + जीएसटी​​वरून २५० रुपये + जीएसटी​​पर्यंत वाढवण्यात आलं आहे. 

प्लॅटिनम डेबिट कार्ड 

एसबीआय प्लॅटिनम डेबिट कार्डासाठी वार्षिक देखभाल शुल्क २५० रुपये + जीएसटीवरून ३२५ रुपये + जीएसटी पर्यंत वाढवण्यात आलंय. 

प्रीमिअम बिझनेस डेबिट कार्ड 

प्राईड प्रीमिअम बिजनेस डेबिट कार्डासारख्या एसबीआय डेबिट कार्डासाठी वार्षिक देखभाल शुल्क ३५० रुपये + जीएसटी​​वरून ४२५ रुपये + जीएसटी ​​पर्यंत वाढवण्यात आले आहे. 

एसबीआय कार्डकडूनही बदल 

१ एप्रिल २०२४ पासून काही क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून रेंट पेमेंट केल्यास त्यावर रिवॉर्ड पॉईंटस दिले जाणार नाही. तर काही कार्डांवर १५ एप्रिल पासून रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाही.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँक