जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला एखादी मालमत्ता किंवा काहीतरी बँकेकडे तारण म्हणून गहाण ठेवावं लागतं. तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर बँक तुमच्या त्या मालमत्तेद्वारे त्यांचं नुकसान भरून काढू शकते. परंतु काही प्रकरणांमध्ये, कर्ज देताना, बँकेला कर्जाच्या जामीनदाराची आवश्यकता असते. अनेक वेळा लोक त्यांची मैत्री आणि नातेसंबंध जपण्यासाठी कर्जाचे जामीनदार होण्यास सहज सहमत होतात. परंतु एखाद्याला कर्जासाठी जामीनदार होण्याचा निर्णय तुम्ही खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे, कारण कर्ज घेणाऱ्यांसोबतच जामीनदाराच्याही काही जबाबदाऱ्या असतात. कर्जदाराने छोटीशी चूक केली तर त्याचे परिणाम कर्जदारालाही भोगावे लागू शकतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.
जामीनदाराची गरज केव्हा असते
- जर कर्जाची रक्कम अधिक असेल आणि डिफॉल्ट जोखीम जास्त असल्यास.
- बँकेला कर्जदाराचे योग्य डॉक्युमेंट्स न मिळाल्यास किंवा कर्जदाराचा सिबिल स्कोअर खराब असल्यास.
- जर मुख्य कर्जदाराचं वय अधिक असेल किंवा त्याचा व्यवसाय जोखमीचा असेल.
- जर बँकेच्या मूलभूत गरजेत लोन गॅरेंटरचा समावेश असेल.
जामीनदाराच्याही असतात जबाबदाऱ्याकर्जदारासोबतच जामीदाराच्याही काही जबाबदाऱ्या असतात. जामीनदाराकडूनही सर्व कागदांवर सह्या घेतल्या जातात. डिफॉल्ट होण्याच्या स्थितीत पहिले बँक कर्जदाराला नोटीस पाठवते. त्यानंतर उत्तर न मिळाल्यास बँक जामीनदाराला नोटीस पाठवते. जर कर्जदार कर्ज फेडू शकला नाही, तर जामीनदाराला ते कर्ज फेडण्याची जबाबदारी घ्यावी लागते.सिबिलवरही परिणामजर कर्जदारानं कर्ज फेडलं नाही तर लोनची रक्कम जामीनदाराच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लायबलिटी म्हणून दिसते. यामुळे जामीनदाराचाही सिबिल स्कोअर खराब होतो. सिबिल स्कोअर खराब झाल्यास जामीनदाराला भविष्यकाळात कर्ज घेण्याची गरज भासल्यास त्याला समस्या येऊ शकतात. जबाबदारीतून मागे हटणं सोपं नाहीलोन गॅरेंटर या जबाबदारीतून सहजरित्या मागे हटू शकत नाहीत. मागे हटण्यासाठी बँकेकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती त्याचा योग्य पर्याय देईल, तेव्हाच बँक किंवा वित्तीय संस्था याला मंजुरी देते.