Lokmat Money >बँकिंग > पहिल्यांदा होम लोन घेताय? मग या गोष्टीही लक्षा ठेवा, होणार नाही फसवणूक

पहिल्यांदा होम लोन घेताय? मग या गोष्टीही लक्षा ठेवा, होणार नाही फसवणूक

आजच्या काळात, घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जांची मोठी मदत होते. अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली अनेक लोक फसवणुकीला बळी पडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:48 PM2023-11-01T12:48:28+5:302023-11-01T12:49:04+5:30

आजच्या काळात, घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जांची मोठी मदत होते. अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली अनेक लोक फसवणुकीला बळी पडत आहेत.

Taking a home loan for the first time Then keep these things in mind, there will be no cheating know details | पहिल्यांदा होम लोन घेताय? मग या गोष्टीही लक्षा ठेवा, होणार नाही फसवणूक

पहिल्यांदा होम लोन घेताय? मग या गोष्टीही लक्षा ठेवा, होणार नाही फसवणूक

आजच्या काळात, घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जांची मोठी मदत होते. अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली अनेक लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जेव्हा तुम्ही लोन एजंटशी व्यवहार करत असाल, तेव्हा तुम्ही ते सांगत असलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या अटी व शर्तींची काळजी घेणंही आवश्यक आहे. तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि फसवणूक टाळायची असेल तर कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी नक्की जाणून घेतल्या पाहिजे.

डिटेल्स चेक करा
लोनसाठी अर्ज करताना, रजिस्ट्रेशन नंबरसह त्याची माहिती तपासली पाहिजे. भारतात रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय कोणताही कर्जदाता कर्ज देऊ शकत नाही. बँक आणि एनबीएफसी (Non-Banking Financial Corporation) कडून कर्ज घेणं कायम सुरक्षित असतं.

वेबसाईट तपासा
लोन घेणाऱ्यांनी वेबसाईटवरही माहिती तपासली पाहिजे. यामध्ये कंपनीचा सीआयएन, नोंदणी प्रमाणपत्र सीईओआर सह अन्य माहितीचा समावेश आहे. सामान्यत: फसवणूक करणाऱ्या लेंडर्सकडे कोणतीही अशी माहिती किंवा वेबसाईट नसते. यावरून तुम्ही सहजरित्या फेक लेंडरची ओळख पटवू शकता.

क्रेडिट चेक आवश्यक
कोणताही लेंडर तुमची क्रेडिट हिस्ट्री, म्हणजेच तुमचा CIBIL स्कोर तपासल्याशिवाय कधीही कर्ज देऊ शकत नाही. शेवटी, तो तुम्हाला पैसे उधार देत आहे आणि तुम्ही ते वेळेवर परत कराल हे त्याला हे माहित असणं आवश्यक आहे. लेंडरनं तुम्हाला पाहिलं नसल्यामुळे, तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकाल की नाही याचं विश्लेषण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या CIBIL स्कोअरद्वारे तुमचा क्रेडिट इतिहास तपासणं. जर त्यानं हे केलं नाही तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते.

लेंडर रिव्ह्यू तपासा
लेंडर प्रामाणिक आहे का नाही हे तपासण्याची सोपी आणि त्वरित होणारी पद्धत म्हणजे इंटरनेटवर विद्यमान ग्राहकांकडून त्यांना देण्यात येणारं रेटिंग आणि त्यावरच्या कमेंट. अनेकदा काही लेंडर्स आपणहूनच फेक आणि खोटे रिव्ह्यू टाकत असतात. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

हिडन फी
कोणत्याही लेंडरकडून लोन घेण्यापूर्वी कर्ज घेणाऱ्यांनी तपासलं पाहिजे की ते मूल्यांकन आणि क्रेडिट रिपोर्टसह लोन अॅप्लिकेशनबाबत सर्व डिटेल्सची माहिती ठेवत आहे. लोनच्या वेळी कोणत्याही प्रकारची हिडन फी फसवणुकीचा संकेत असू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा कर्ज घेताना माहित असलेल्या ठिकाणाहूंन सतर्क राहून कर्ज घेणं आवश्यक आहे.

Web Title: Taking a home loan for the first time Then keep these things in mind, there will be no cheating know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.