Join us

Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 3:29 PM

Punjab National Bank : या सरकारी बँकेकडून आता लोन घेणं थोंडं महागणार आहे. पाहूया कोणती आहे ही बँक आणि किती पडणार तुमच्या खिशावर भार.

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी ही वाढ वेगवेगळी आबे. बँकेनं एमसीएलआर दरात ३ महिन्यांपासून ३ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी बदल केला आहे. नवे दर १ जून २०२४ पासून लागू झाले आहेत. 

पंजाब नॅशनल बँकेने पूर्वीप्रमाणेच काही टर्म रेट ठेवले असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. उदाहरणार्थ, ओव्हरनाईट एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो पूर्वीच्या दराप्रमाणेच ८.२५ टक्के आहे. त्याचप्रमाणे बँकेनं एमसीएलआर दर १ महिन्याच्या कालावधीसाठी ८.३० टक्क्यांवर स्थिर ठेवला असून कोणताही बदल केलेला नाही. 

मात्र, १ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.४५ टक्क्यांवरून ८.५० टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ६ महिन्यांच्या एमसीएलआरचा दरही ८.६५ टक्क्यांवरून ८.७० टक्के करण्यात आला आहे. 

त्याचप्रमाणे एका वर्षासाठी हा दर ८.८० टक्क्यांवरून ८.८५ टक्के करण्यात आला आहे. तर ३ वर्षांचा एमसीएलआर दर ९.१० टक्क्यांवरून ९.१५ टक्के करण्यात आलाय. या कालावधीसाठी व्याजदरात वाढ झाल्यानं आता जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून या कालावधीसाठी कर्ज घेतलं तर ते तुम्हाला पूर्वीपेक्षा थोडं अधिक महागात पडेल.

टॅग्स :बँकपंजाब नॅशनल बँक