Join us  

घर किंवा दुकान गहाण ठेवून कर्ज घेताय? 'हे' ४ प्रश्न स्वतःला विचारा, अन्यथा गोत्यात याल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:55 PM

Property Loan : प्रॉपर्टी लोन घेण्याचा विचार करत असाल तर हे ४ प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. कारण, यात तुम्ही मालमत्ता गमावण्याचा धोका असतो.

Property Loan : सध्याच्या काळात आर्थिक नियोजन करणे फार आवश्यक आहे. अनेकदा आपात्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची गरज भासू शकते. अशात आपल्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर आपल्याला कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत लोक वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतात. मात्र, वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमच्यासाठी नोकरी असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे कोणतीही नोकरी नसेल आणि तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला खूप जास्त व्याजदराने कर्ज देते. यावेळी तुम्ही प्रॉपर्टी लोन घेऊ शकता. प्रॉपर्टी लोनमध्ये, तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तारण म्हणून ठेवून कर्ज घेऊ शकता. पण हे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे.

कर्ज कशासाठी घेताय?प्रॉपर्टी लोन घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कर्जाच्या गरजेचा विचार केला पाहिजे. कर्जाचा तुमच्या परिस्थितीवर काय परिणाम होईल? विशेषतः जेव्हा तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेत असाल. तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच कर्ज घ्या. कारण, जर व्यवसाय फसला तर तुम्ही कर्ज कसं फेडणार? याचा विचार करुनच निर्णय घ्या.

कर्ज फेडले नाही तर काय होईल?मालमत्ता कर्ज हे सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमची मालमत्ता गहाण ठेवून बँक कर्ज देते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरलात तर तुमची मालमत्ता गमावू शकता. सुरक्षित कर्ज असल्याने तुम्हाला कमी व्याजदराने प्रॉपर्टी लोन मिळते.

प्रॉपर्टी लोनवर चार्जप्रॉपर्टी लोनवर अनेक प्रकारचे चार्जेस असतात. अशा परिस्थितीत, प्रॉपर्टी लोन घेण्यापूर्वी या सर्व शुल्कांची माहिती घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मालमत्ता कर्जावर प्रक्रिया शुल्क, मालमत्तेच्या मूल्याच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकन शुल्क, कागदपत्रांसाठी कायदेशीर खर्च आणि पडताळणी यांसारखे शुल्क आकारले जाते. याशिवाय, त्यात कायदेशीर कागदपत्रांवर सरकारने लादलेली मुद्रांक शुल्क, मालमत्ता रेकॉर्डिंगसाठी नोंदणी शुल्क आणि गहाणखत यांचाही समावेश आहे.

मालमत्तेचे मूल्यांकनबँका मालमत्ता मूल्यांकनाच्या आधारे कर्ज देतात. समजा मालमत्तेच्या मूल्यात घट झाली असेल तर त्यामुळे नकारात्मक इक्विटी होऊ शकते. अशा स्थितीत कर्जदाराला मालमत्तेच्या सध्याच्या मूल्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रमाकड